मोठी बातमी - कोरोनाच्या लसीसाठी वोक्हार्ट रुग्णालयाचा युकेसोबत महत्त्वपूर्ण करार

मोठी बातमी - कोरोनाच्या लसीसाठी वोक्हार्ट रुग्णालयाचा युकेसोबत महत्त्वपूर्ण करार

मुंबई : वोक्हार्ट रुग्णालयाने UK सरकाससोबत कोरोनाची लस पुर्ण करण्यासाठी एक करार केला आहे. नॉर्थ वेल्समधील रेक्सहॅम येथील वोक्हार्टची उपकंपनी सीपी फार्मास्युटिकल्स येथे हे उत्पादन केले जाणार आहे. कराराच्या अटींनुसार कंपनीने युके सरकारला अनेक लसींचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यासाठी राखीव क्षमता ठेवली आहे. ज्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि त्यांची स्पिनआउट कंपनी व्हॅकीटेक यांनी संयुक्तपणे तयार केलेली लस आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका द्वारा परवानाकृत असणार आहे. 

याविषयी वोक्हार्टचे संस्थापक डॉ. हबिल खोराकीवाला म्हणाले की, “ कोविड 19 ची महामारी सर्वांना एक आव्हान आहे आणि त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. आम्हाला लस उपलब्ध करुन देण्यासाठी यूके सरकारने सहकार्य केल्याचा अभिमान आहे. जागतिक संस्था म्हणून, कोविड -19 चा जागतिक प्रभाव कमी करण्यात आम्ही लक्ष केंद्रित केले आहे आणि मदत करण्यास वचनबद्ध आहोत.

"कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी, सुरक्षित आणि प्रभावी लस संशोधन करण्यासाठी, लस विकसित करण्याची क्षमता UK मध्ये आहे." - आलोक शर्मा, व्यापार, ऊर्जा आणि औद्योगिक धोरण राज्यमंत्री, यूके सरकार 

कराराबद्दल बोलताना व्यवस्थापकीय वोक्हार्ट यूकेचे संचालक रवी लिमये म्हणाले, “ आम्हाला या प्रकल्पासाठी यूके सरकारबरोबर भागीदारीसाठी निवडण्यात आले याचा अत्यंत अभिमान आहे. यामूळे, ककोविड -19 च्या साथीच्या रोगाविरुद्ध देशाच्या लढाईत अग्रगण्य भूमिका घेत आहोत. आमच्याकडे अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उत्पादन सुविधा आणि अत्यंत कुशल कामगार दल आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत लसीचा पहिला डोस उपलब्ध होईल.

( संपादन - सुमित बागुल ) 

wockhardt hospitals did mou with UK government for corona vaccine

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com