धक्कादायक : चक्क मुलीबराेबच्या पहिल्या शारीरिक संबंधासाठी आईने लावली दीड लाखाची बोली

विक्रम गायकवाड
Thursday, 3 September 2020

सोनम ही मिरा रोड येथे राहते. तिने पैशांच्या मोहातून 18 वर्षांच्या मुलीला दीड लाख रुपयांमध्ये पहिल्या शारीरिक संबंधासाठी बोली लावली होती. त्यासाठी तिने बड्या ग्राहकांचा शोध सुरू केला होता.

नवी मुंबई : स्वत:च्या मुलीच्या पहिल्या शारीरिक संबंधासाठी 1 लाख 20 हजार रुपये घेणाऱ्या मिरा रोड येथील एका महिलेला नेरूळ येथे सापळा रचून अटक केली. पीडित मुलीला पोलिसांनी सुधारगृहात पाठविले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सोनम सिंग (40) आहे. 

सोनम ही मिरा रोड येथे राहते. तिने पैशांच्या मोहातून 18 वर्षांच्या मुलीला दीड लाख रुपयांमध्ये पहिल्या शारीरिक संबंधासाठी बोली लावली होती. त्यासाठी तिने बड्या ग्राहकांचा शोध सुरू केला होता. याबाबतची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांच्या पथकाने या कारवाईसाठी बनावट ग्राहक तयार करून त्याच्यामार्फत सोनम सिंगसोबत बोलणे केले. 

हे वाचा : रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय

या वेळी सोनम सिंग हिने मुलीबरोबर पहिल्या शारीरिक संबंधासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. या वेळी बनावट ग्राहकाच्या मदतीने एक लाख 20 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरविला. त्यानंतर सोमवारी नेरूळ - शिरवणे गाव येथील हॉटेल कोहिनूर पॅलेसमध्ये एका रूमचे आरक्षण केले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोनम सिंग ही मिरा-भाईंदर येथून मुलीला घेऊन आली. त्यानंतर बनावट ग्राहकाने तिच्याशी बोलणी करून तिच्या मुलीला हॉटेलच्या खोलीत नेण्यात आले. या वेळी कपडे काढत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन गरड आणि पथकाने छापा टाकला.

हे वाचा : दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर

मुलीला वेश्‍या व्यवसायासाठी सौदा लावल्याप्रकरणी सोनम सिंगला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरोधात नेरूळ ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या मुलीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman  was arrested at Nerul for taking Rs 1 lakh 20 thousand for her daughter's first physical relationship