Dangerous Mumbai Local Journey
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - 'मुंबई लोकलचा प्रवास म्हणजे रोज जीव मुठीत धरून केलेला प्रवास,' ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान घडली. धावत्या लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका महिलेची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याने काही क्षणांसाठी हृदयाचा ठोका चुकवणारा प्रसंग ओढवला. अवघ्या काही इंचांचे अंतर आणि काही सेकंदांचा फरक यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, मुंबई लोकलमधील अतिगर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.