संजय राऊत प्रकरण : 'त्या' महिलेच्या तक्रारीचा फेरतपास करण्याचे कोर्टाचे आदेश |Sanjay raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

संजय राऊत प्रकरण : 'त्या' महिलेच्या तक्रारीचा फेरतपास करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेच्या तक्रारीचा फेरतपास (Complaint reinvestigation) करण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (court order) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे मेट्रो 3 च्या खर्चात वाढ; 108 कोटींनी वाढला खर्च

निर्माती असलेल्या महिलेने राऊत यांच्यावर धमकावणीचे आरोप केले आहेत. जून 2013 आणि मे 2013 मध्ये काही अज्ञात इसमांनी पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि राऊत यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला अशी तक्रार महिलेने केली आहे. पोलिसांनी यामध्ये ए समरी अहवाल सादर केला आणि गुन्हा घडला आहे पण आरोपींविरोधात पुरेसा पुरावा नाही असे स्पष्ट केले आहे.

हा अहवाल मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच ज्यांची नावे तक्रारदाराने दिली होती त्यांचा जबाब नोंदवला नाही, त्यामुळे यामध्ये विविध बाजू तपासल्या नाही असा शेरा न्यायालयाने ओढला आहे आणि फेरतपासाचे आदेश दिले. राऊत यांनी सर्व आरोपांचे खंडन यापूर्वीच केले आहे.

loading image
go to top