ठाण्यात आढळला कोरोना संशयित रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

उपचारासाठी कस्तुरबामध्ये रवानगी 

ठाणे : चीन येथून ठाण्यातील बहीणीकडे राहण्यासाठी आलेल्या महिलेला संशयीत कोरोना रुग्ण म्हणून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाच दिवसापुर्वी चीन येथून आपल्या बहिणीकडे रहायला आलेल्या व मुळच्या पुण्यातील रहिवासी असलेल्या एका 40 वर्षीय महिलेला कोरोना सदृष्य आजार आढळल्याने भीती निर्माण झाली होती. त्या महिलेला सर्दी खोलका झाल्याने आणि त्या नुकत्याच चीनहून आल्या असल्या कारणाने त्यांना तत्काळ मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

मोठी बातमी - 'या' सुपच्या सेवनामुळे कोरोना पसरला जगभरात, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना रोगाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. भारतात येणाऱ्या प्रवाश्‍यांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून विमानतळावर ही आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. या आजारामध्ये बाधित व्यक्तीस सर्वसाधारणपणे तीव्र ताप, कफ तसेच श्वास घेण्यास त्रस होणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये जर सदृश्‍य लक्षणे आढळली तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार सुरु करावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

त्यात 26 जानेवारी रोजी चीनहून ठाण्यातील घोडबंदर रोड येथे आपल्या बहीणीकडे रहायला आलेल्या व मुळच्या पुण्यातील सहिवासी असलेल्या एका 40 वर्षीय महिलेला सर्दी खोकला झाला होता. त्यात त्या चीनवरून आल्याने त्यांना कोरोना आजार असल्याच्या संशयावरून त्यांना बुधवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तेथे त्यांची कोरोना आजाराबाबातच्या चाचण्या करण्यात आल्या. 

मोठी बातमी - मदत करण्याच्या बहाण्याने ते एटीएममध्ये शिरायचे आणि...

मात्र, प्राथमिक तपासणीत कोरोनासदृष्य आजाराचे कोणतेही लक्षण आढळून न आल्याने त्यांना नियमित उपचार करुन सोडून देण्यात आले असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 

women from thane tested for the symptoms of corona virus 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women from thane tested for the symptoms of corona virus