Women Risk Their Lives at Mumbai Local Train Doors for Patriotic Reels
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर देशभक्तिपर रील्सचा ट्रेंड सुरू आहे. ‘आय लव्ह माय इंडिया’ सारख्या देशप्रेमाच्या गाण्यांवर रील तयार करून ती व्हायरल करण्याची चढाओढ सुरू असतानाच, दोन महिलांनी रीलसाठी चक्क धावत्या लोकलच्या दरवाजात उभे राहून रील तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. साडी परिधान केलेल्या या महिलांचा रील चित्रित करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.