लॉकडाऊन दिलासा... रेल्वेस्थानकांतील पूल उभे राहताहेत

डोंबिवली पुलाची दुरुस्ती
डोंबिवली पुलाची दुरुस्ती
Updated on

मुंबई ः लॉकडाऊनमुळे घरातच अडकलेल्या मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. दीर्घ कालावधीसाठी बंद असलेल्या रेल्वेच्या पुलांच्या कामांना वेग आला आहे. डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याणच्या दिशेकडील पादचारी पूल तर जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारी रेल्वे प्रशासनाने केवळ चार तासांत पुलावर 8 गर्डर बसविण्याचे काम फत्ते केले.  

हे वाचलं का? : `श्रमिक स्पेशल`च्या नावावर दलालांकडून अवैध वसुली

लॉकडाऊन सुरू होण्याच्या सुमारास पुलांचे काम चालू झाले होते. सध्या कोणतीही रेल्वे वाहतूक सुरू नसल्याने विविध  रेल्वेस्थानकांतील पुलांचे काम जोरात सुरू आहे.

डोंबिवलीतील पूल धोकादायक जाहीर केल्यानंतर तो पाडण्यासाठीही वेळ लागला होता. लॉकडाऊनपूर्वी म्हणजेच 17 मार्चला चार तासांचा ब्लॉक घेऊन त्याचे काम सुरू झाले. त्या वेळी पुलाची कमान बसवण्यात आली होती. आठ गर्डर असलेल्या पुलाच्या दोन कमानी बसवण्याचे काम 17 मे रोजी पूर्ण झाले. आता अखेरची कमान बसवण्याचे काम 27 मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुलाची अन्य कामे सुरू होतील. 

महत्त्वाचं : वांद्रे स्थानकांबाहेर पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा...

इतर पुलांच्या कामांसही वेग

मध्य आणि पश्चिम रेल्वेने लॉकडाऊनचा फायदा घेत अन्य पुलांच्या कामासही वेग दिला आहे. चार तासांचा किमान ब्लॉक आवश्यक असलेल्या दादरच्या पुलाचेही काम सुरू झाले आहे. मालाडच्या विरार दिशेकडे असलेल्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. चर्चगेटच्या दिशेला असलेल्या पुलाच्या कामास वेग आला आहे. लोअर परळच्या विरार दिशेकडे असलेला जुना दगडी पूल हटवण्याचे काम झाले आहे. रस्त्याच्या पुलाचे कामही वेगाने सुरू आहे. वांद्रे स्थानकाच्या मध्यास असलेल्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. वांद्रे टर्मिनसवर चर्चगेटच्या दिशेने असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लोकल सेवा सुरू असती तर टप्प्याटप्याने डोंबिवली पुलाचे काम पूर्ण करावे लागले असते. त्यासाठी बराच कालावधी लागला असता. मात्र, लॉकडाऊनमुळे केवळ चार तासांत गर्डर टाकण्यात आले.  पुलाचे 50 टक्के काम पूर्ण झाले  आहे. उर्वरित काम लवकरच होईल.
- अनिलकुमार जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com