जागतिक रक्तदाता दिन : दुर्मिळ रक्तगटाच्या दानाची पन्नाशी

सांगलीतील विक्रम यादवांनी बॉम्बे ब्लड ग्रुपचे ५४ वेळा दान
World Blood Donor Day
World Blood Donor Daysakal

मुंबई : रक्त हा शरीरातील असा घटक आहे. ज्याला प्रत्यक्क्षात मनुष्याची गरज पडते. पण, मुंबईसह महाराष्ट्रात रक्तदानाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यातून जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदानासाठी  पुढाकार घ्यावा अशी मागणी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जोर धरु लागली आहे.

१९९५ मित्त्राचा अपघात झाला. त्यावेळेस मित्त्राला रक्ताची गरज होती. धावपळ करुनही मित्त्राला वेळेला रक्त मिळाले नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मी स्वत त्यानंतर रक्त गटाची तपासणी करुन घेतली. तेव्हा डॉक्टरांनी माझा रक्त गट बॉम्बे ब्लड ग्रुप हा आहे, आणि तो सर्वात दुर्मिळ रक्तगट म्हणून ओळखला जातो. तेव्हाच ठरवले की रक्तदानात उत्स्फुर्त पुढाकार घ्यायचा. अशा एकूण १० मित्त्रांनी एक संकल्पना मनाशी बाळगली. कुणालाही , कधीही रक्त लागलं तर कुठेही जाऊन रक्त देऊन यायचं.

रक्त मिळाले नाही म्हणून कोणाचाही जीव जाऊ नये यात हेतूतून १९९५ पासूनच आतापर्यंत सांगली तासगावातील विक्रम यादव यांनी एकूण ५४ वेळा बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाच्या रक्ताचे दान केले आहे. आता या चळवळीत जवळपास २ लाख नागरिकांनी सक्रिय पुढाकार घेतला आहे. तसेच, गरीब, गरजू रुग्ण असेल आणि पैशाअभावी त्याला रक्त मिळत नसेल तर त्यासाठी ही सुविधा केली गेली. १५,७३० सदस्य या कामात पुढाकार घेतात. १५,७३० सदस्य एका वेळी १० रुपये काढून १ लाख ५७ हजार ३०० रुपये जमा करतो.

ज्या रुग्णांकडे उपचारांसाठी पैसे नसतात अशा रुग्णांना ते दिड लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत झारखंड, रांची, आग्रा अशा २२ राज्यांमध्ये कमीत कमी १८ वेळा रक्तदान केले गेले. तसेच, आता या ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याने किमान ५० ते ६० वेळा रक्तदान केले आहे. बॉम्बे ब्लड ग्रुपच्या ५७० शाखा २२ राज्यांमध्ये सुरु आहेत. या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाचे भारतात १७९ रक्तदाते आहेत आणि जगात फक्त २३० जण आहेत. २९ राज्यांच्या व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवरुन जिथे कुठे या रक्तगटाच्या रक्ताची गरज असते तिथे किमान १ ते २ तासांत रक्त उपलब्ध करुन दिले जाते.

काय आहे बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट ?

सामान्यत: ए, बी, एबी, ओ पॉझिटीव्ह, नेगेटीव्ह असे रक्तगट आढळतात. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अत्यंत दूर्मिळ रक्तगट आहे. ओ पॉझिटीव्ह या रक्तगटात एच फॅक्टर नसतो. त्यामुळे लाखांत दहा जणांमध्ये हा ब्लडग्रुप आढळतो. या ग्रुपचा शोध आधी मुंबईच्या केईएम रुग्णालयात लागला होता. त्यामुळे या रक्तगटाचं नाव बॉम्बे ब्लड ग्रुप ठेवण्यात आलं आहे.

रक्ताअभावी जीव जाऊ नये -

आजपर्यंत ज्यांना रक्त मिळवून दिले आहे त्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला या चळवळीत सहभागी करुन घेतले जाते. कारण, कोणत्याही व्यक्तीचा रक्ताअभावी जीव जाऊ नये हा उद्देश्य असल्याचेही यादव सांगतात.

कांदिवली ठाकूर व्हिलेज मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय कमलेश देवाले यांचा २०१७ मध्ये दहिहंडी सणादरम्यान बाईकचा अपघात झाला. तेव्हा रक्ताची खूप गरज लागली होती. कमलेशने या अपघातात आपला डावा पाय कायमचा गमावला आहे. आणि दुसऱ्या पायात रॉड टाकला आहे. पण, आता त्यांना रक्तदानाचे महत्त्व ठसठशीत समजले असून त्यांनी आपल्या अपघातानंतरही रक्तदान सुरु ठेवले आहे. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा रक्तदान केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com