esakal | जागतिक पुस्तक दिन विशेष : वाचक आहे तो पर्यंत पुस्तक व्यवसायाला मरण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक पुस्तक दिन विशेष : वाचक आहे तो पर्यंत पुस्तक व्यवसायाला मरण नाही

हे ही दिवस सरतील, पुन्हा ग्रंथदालने गजबजतील,  प्रकाशकांचा विश्वास 

जागतिक पुस्तक दिन विशेष : वाचक आहे तो पर्यंत पुस्तक व्यवसायाला मरण नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 23 - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिीमुळे सर्व व्यवसायावर संकट आहे. यामध्ये पुस्तक व्यवसायालाही जावे लागत आहे. फेब्रुवारी अखेर ते मार्च असा पुस्तक व्यवसायाचा हंगाम असतो. परंतु या काळात लॉकडाऊन झाल्याने पुस्तक प्रकाशन व्यवसायाचे नुकसान झाले. गेले एक महिना झाला पुस्तक प्रकाशन व्यवसाय पूर्णतः ठप्प आहे. या व्यवसायवर अवलंबून असलेले प्रीटिंग प्रेस, डीटीपी, वितरण अशा सर्व उद्योगांवर परिणाम झाला आहे. राज्यातील प्रकाशन व्यवसायाची एकूण उलाढाल सुमारे 50 कोटी आहे. यातील मुंबई-पुण्यातील वाटा जास्त आहे. आज सर्व थांबले आहे. नुकसान होत असले तरी एक आशादायी चित्र या काळात दिसले की, लोकांना अजून वाचनाची भूक आहे. पुस्तक वेडा वाचक पुस्तक वाचल्याशिवाय राहत नाही. लॉकडाऊन अजून किती काळ असेल या अनिश्चितचा आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशन व्यवसाय पुन्हा कधी सुरू होईल या बाबतची अनिश्चिता आहे. तसेच लॉकडाऊननंतर पुस्तक प्रकाशन व्यवसायाची घडी बसायला तीन-चार महिन्याचा काळ जावा लागेल, असे प्रकाशकांचे म्हणणे आहे. पण सर्व सुरळीत झाल्यावर वाचक पुस्तक विकत घेतील, असा विश्वास प्रकाशकांनी व्यक्त केला.

निर्णय झालाय, 24, 25 आणि 26 एप्रिलला कडकडीत जनता कर्फ्यू... 

 पुढे आर्थिक मंदीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे, अशा वेळी प्रकाशन व्यवसाय कसा तग धरेल, अशा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थिती प्रकाशन व्यवसायाला उभारी देण्यासाठी सर्व प्रकाशकांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजे, तशा उपापयोजन करणे आवश्यक आहे. तसेच सरकारनेही या व्यवसायाला उभे राहण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे, असे प्रकाशक म्हणतात.

मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर म्हणाले, कोरोनामुळे प्रकाशन व्यववसाय पूर्णतः थांबला आहे. नुकसान झाले. पण जेव्हा लॉकडाऊन संपेल त्यावेळी हा व्यवसायाच्या मागे राज्य सरकारने उभे राहावे. अनुदान, छपाईच्या कागदात सूट, ग्रंथ खरेदीसाठी योजना राज्य सरकारने राबवणे आवश्यक आहे. तसेच प्रकाशन व्यवसायाला पुर्ववत येयला तीन-चार महिन्याचा काळा लागेल. त्या काळात वाचकवर्ग मिळवण्यासाठी प्रकाशकांनी एकत्रिक येऊन प्रयत्न केले पाहिजे. जो पर्यंत वाचणारा आहे तो पर्यंत या व्यवसायाला मरण नाही. मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे यांनी सांगितले, या व्यवसायाला मरण नाही. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचून काढली. हा लॉकडाऊनमुळे ग्रंथ दालन बंद असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागेल. लवकरच सुरळीत झाले तर प्रकाशन व्यवसाय दिवाळीपर्यंत जोम धरेल. यासाठी प्रकाशक, वितरक, लेखकांची एकजूट हवी. पुस्तक खरेदीला लाख रुपये मोजावे लागत नाही. दोन पुस्तके 500 रुपयात किंवा एखादे पुस्तक 100 -150 रुपयातही विकत घेता येते. आर्थिक मंदी आली तरी पुस्तक विक्री फार परिणाम होणार नाही. खरा वाचक पुस्तक खरेदी करतो, असे कोठावळे यांनी मत व्यक्त केले.

कोरोनामुळे शरीराचे कोण-कोणते भाग होऊ शकतात निकामी, जाणून घ्या

पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे म्हणाले, कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती अतिशय भयावह आहे. यातून कधी सुटका होणार याची शाश्वती मिळत नाही. त्यामध्ये व्यवसायाचे भवितव्याबद्दल सांगणे कठिण आहे. मात्र या परिस्थितीमुळे प्रकाशन व्यवसायाला आर्थिक संकाटातून तोंड द्यावे लागते. सर्व परिस्थिती पूर्ववत झाली तरी लोक पुस्तक विकत घेण्यासाठी लगेच बाहेर पडणार नाही. त्यामुळे प्रकाशकांना संयमाने ही परिस्थिती हाताळावी लागेल. रखडेली पुस्तकांची कामेही लगेच() सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे लगेचच नवी पुस्तक बाजारातील येतील असेही नाही. प्रकाशकांचे गट तयार करुन राज्यात प्रदर्शन भरुन वाचक वर्ग पुन्हा जोडावा लागेल. या व्यवसायाला उभारी येण्यासाठी दिवाळीपर्यंत प्रतिक्षा करावी लागले. दिवाळी अंकाबरोबर प्रकाशन व्यवसाय पुन्हा जोम धरेल. मेहला पब्लिकेशनचे सुनील मेहता म्हणाले, लॉकडाऊनममुले व्यवसाय पूर्णतः थांबला. याच काळात ई-बुक्स, ऑडिओ बुक्स लोकांनी वाचणे-एेकणे पसंत केले. ही बाब व्यवसायासाठी सकारात्मक आहे. लोकांना पुस्तक हवी आहेत. लॉकडाऊनमध्ये प्रकाशकांना वाचकांपर्यंत कशा पद्धतीने पुस्तके नेता येईल, कोणते विषय त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला. आमची सुमारे 15 पुस्तके मार्च-एप्रिलमध्ये प्रकाशित होणार होती. पण ते लॉकडाऊनमुळे शक्य झाले नाही. लॉकडाऊन संपताच ती वाचकांना उपलब्ध होतील, असे सुनील मेहता यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे विविध प्रकाशकांची रखडलेल्या पुस्तकांची यादी

मॅजेस्टिक प्रकाशन - भालचंद्र नेमाडे व्यक्ती, विचार, साहित्य, निवडक अनिल अवचट, जैतापूर ते पॅरिस वाया बर्लिन - प्रदीप इंदूलकर, द वॉर्म्थ ऑफ द अदर सन्स या पुस्तकाचा अनुवाद गाणे स्थलांतरांचे - प्रणव सखदेव

मनोविकास प्रकाशन - पुष्पा भावे यांचे चरित्र, पायपीट समाजवादीची , फकिरेचे वैभव -विदर्भातील शेतकरी नेते विजय विल्हेकर, विज्ञानवरील पुस्तक

पद्मगंधा प्रकाशन - प्रेमातून प्रेमाकडून(पुर्नप्रकाशन ) - अरुणा ढेरे, तत्त्वज्ञानी आंबेडकर - यशवंत महानोर, प्लेग कादंबरी

मेहता पब्लिकेशन – भावनागुलो – तसलिमा नासरिन, चर्चिलच्या पाऊलखुणा – रिचर्च होम्स अनुवाद- अनधुत डोंगरे, हरित युद्धे – बहार दत्त, संत कान्होपात्रावर आधारित समर्पण – मंजुश्री गोखले, विल्बर स्मिथ यांचे रिव्हर गॉड – सुभाष जोशी

loading image