
मुंबई : वरळीत चायनीज फॅक्टरीत काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. चायनिज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकल्यानं तरुण मशीनमध्ये ओढला गेला. त्याची मान मशिनमध्ये अडकली आणि त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मशिनमधून त्याचा मृतदेह बाहेर काढला.