STP Project : वरळीच्या एसटीपी प्रकल्पाचा फटका १२५० झाडांना?

एसटीपी प्रकल्पासाठी १२५० झाडांपैकी ५७३ झाडे कापण्यात येणार आहेत. तर ६७७ झाडांचे पुर्नरोपण करण्यात येईल.
Tree Cutting
Tree CuttingSakal
Summary

एसटीपी प्रकल्पासाठी १२५० झाडांपैकी ५७३ झाडे कापण्यात येणार आहेत. तर ६७७ झाडांचे पुर्नरोपण करण्यात येईल.

मुंबई - मुंबईत काही दिवसांपूर्वी मलनिसारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यापैकी वरळी येथील लव्हग्रुव्ह पंपिंग स्टेशनच्या मागील बाजुला १२५० झाडे कापण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या प्रस्तावीत एसटीपी साठी पालिका झाडे कापणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने या १२५० झाडांबाबतची जाहीर सूचना काढली आहे. त्यानुसार नागरिकांच्या हरकती आणि सूचना या प्रकरणात मागविण्यात आल्या आहेत.

एसटीपी प्रकल्पासाठी १२५० झाडांपैकी ५७३ झाडे कापण्यात येणार आहेत. तर ६७७ झाडांचे पुर्नरोपण करण्यात येईल. या एसटीपी प्लांटच्या निमित्ताने संपूर्ण प्रकल्पात किमान झाडे कापली जातील, या अनुषंगाने प्रकल्पाची डिझाईन करण्यात यावी, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या होत्या. कमीत कमी झाडांवर परिणाम होऊन हा प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. या प्रकरणात कंत्राटदाराला झाडे वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न न केल्याने कारणा दाखवा नोटीसही २८ डिसेंबर २०२२ रोजी बजावण्यात आलेली आहे. प्रकल्पाअंतर्गत झाडे वाचवण्यासाठी किंवा पुर्नरोपण करण्यासाठी कोणताही प्रयत्न न केल्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.

वरळीच्या मॅनग्रुव्हज पंपिंग स्टेशनच्या मागील बाजुला हा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्ग कोणत्याही कांदळवनाचे नुकसान होणार नाही. केवळ लहान आणि मोठ्या झाडांची कत्तल होणार आहे. एका रहिवासी भागाच्या नजीकच या झाडांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे. वरळी येथील प्रस्तावित एसटीपी प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आहे. महानगरपालिकेच्या एमएसडीपी प्रकल्पाअंतर्गत जवळपास सात कंत्राटदारांना या प्रकल्पाचे २६ हजार कोटी रूपयांचे काम देण्यात येणार आहे.

मुंबईतील सात एसटीपी प्रकल्पाअंतर्गत सात ठिकाणी वरळी, वांद्रे, कुलाबा, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडूप याठिकाणाहून मलनिसारण प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअंतर्गत २४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर या एसटीपी प्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया होणार आहे. सध्याचा वरळीतील एसटीपी प्रकल्प हा २००६ पासून कार्यरत आहे. तसेच याठिकाणी ३ एमएलडी इतक्या मलनिसारण पाण्यावर प्रक्रिया प्रतिदिन केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com