लोकलच्या लेडीज डब्यासमोर पिवळे पट्टे; का ते वाचा..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

महिला प्रवाशांचा लोकल प्रवास सुरक्षित आणि सुसह्य व्हावा म्हणून डोंबिवली स्थानकातील पाच क्रमांकाच्या फलाटावर लेडीज डब्यासमोर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत...

मुंबई : डिसेंबर महिन्यात डोंबिवली आणि कोपर रेल्वेस्थानकांदरम्यान प्रवशांनी खचाखच भरलेल्या जलद लोकलमधून पडून 22 वर्षांच्या तरुणीला जीव गमवावा लागला. त्यानंतर डोंबिवली स्थानकातील गर्दी सोशल मीडिया चांगलीच गाजली. त्याची दखल घेत महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनांसह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली स्थानकातील फलाटावर महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यासमोर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत येथून महिला प्रवाशांनी डब्यात रांगेत चढावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 
ही बातमी वाचली का? दारूड्या पतीला कंटाळून भंगार डिलर शोधला, पण त्याने अंगावर ओतलं...

दररोज लाखो प्रवासी डोंबिवली रेल्वेस्थानकातून प्रवास करतात. त्यांचा जीवघेणा प्रवास वेगवेगळ्या माध्यमातून सर्वांसमोर येतो. डोंबिवली रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफने पुढाकार घेतला आहे. तेजस्विनी महिला संघटनेच्या सहकार्याने महिला आरक्षित डब्यात समोर पिवळे पट्टे मारण्यात आले आहेत.

ही बातमी वाचली का? `हा` कांदा आलाय बाजारात, त्याचे आहेत औषधी गुणधर्म​

पिवळ्या पट्ट्यांमुळे महिलांच्या डब्याची फलाटावरील जागा समजणे सोपे जाणार आहे. डोंबिवली रेल्वेस्थानकावरील पाच क्रमांकाच्या फलाटावर असा प्रयोग करण्यात आला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल फलाट क्रमांक पाचवरून सुटतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी पिवळ्या पट्ट्यांमुळे महिला प्रवाशांना मदत होईल, अशी अपेक्षा आहे. नवीन वर्षापासून ठाणे रेल्वेस्थानकातही लोहमार्ग पोलिसांनी डबा शोधणाऱ्या महिलांसाठी रांग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
 
डिसेंबर महिन्यात अवघ्या 22 वर्षाची चार्मी पासद लोकल गर्दीचा बळी ठरली. तिच्या मृत्यूनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासी संघटना आणि महिला संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यातूनच रांगेचा उपाय करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात महिला प्रवाशांना रांगेतून डब्यात प्रवेश करता यावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. 
- लता अरगडे, महिला रेल्वे प्रवासी संघटना

Yellow stripes in front of the Ladies coach at Dombivli station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yellow stripes in front of the Ladies coach at Dombivli station for women passengers