येस बँक प्रकरण : राणा कपूरच्या प्लॅटवर ईडीची टाच, फ्लॅटची किंमत तब्बल 127 कोटी रुपये

अनिश पाटील
Friday, 25 September 2020

येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने (ED) आरोपी राणा कपूरच्या लंडनमधील फ्लॅटवर टाच आणली आहे

मुंबई : येस बँक गैरव्यवहाराप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने (ED) आरोपी राणा कपूरच्या लंडनमधील फ्लॅटवर टाच आणली आहे. या बंगल्याची किंमत 13.5 मिलीअर पाऊंड (127 कोटी रुपये) आहे.

लंडनमधील 77 साऊथ ऑडले स्ट्रीट येथे ही मालमत्ता आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर याने  2017 मध्ये 93 कोटी रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली होती. डुइट क्रेएशन जर्सी लि. नावावर ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती.  ही मालमत्ता विकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी मालमत्ता सल्लागाराशीही संपर्क साधण्यात आला होता, अशी माहिती ईडीच्या तपासात निष्पन्न झाली आहे. त्याबाबत ईडी अधिक तपास करत आहे.

महत्त्वाची बातमी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं ट्विट का डिलीट केलं ? स्वतः अजित पवारांनी सांगितलं कारण

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडशी (डीएचएफएल) संबधित असलेल्या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीकडून (एनबीएफसी) कपूर कुटुंबाशी सबंधित असलेल्या डूइट अर्बन व्हेंचर प्राईव्हेट लिमिटेड कर्ज देण्यात आलं होते. या कंपनीत कूपर यांच्या मुली रोशनी, राधा व राखी यांचे समाभाग आहेत.  त्याचवेळी डीएचएफएलकडे येस बँकेचे 3 हजार 700 कोटींच कर्ज होते.

राणा कपूर येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असताना या आर्थिक घडामोडी घडल्या त्यावर प्रकार टाकण्यात आला आहे. हे कर्ज देताना गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत 40 कोटींपेक्षाही कमी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. ते प्रत्यक्षात साडे सातशे कोटी रुपये किंमतीची असल्याचे दाखवण्यात आले होते. यापूर्वी याप्रकरणी राणा कपूरश संबंधीत कंबाला हिल येथील इमारत,नेपियन सी रोड येथील तीन ड्युप्लेक्स, नरीमन पॉईंट येथील फ्लॅट,वरळीतील  मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

Yes Bank case ED seized Rana Kapoors flat worth price Rs 127 crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank case ED seized Rana Kapoors flat worth price Rs 127 crore