टक्कल असलेल्या माणसांना कोरोनाचा जास्त धोका ? संशोधक म्हणतात...

टक्कल असलेल्या माणसांना कोरोनाचा जास्त धोका ? संशोधक म्हणतात...

मुंबई - कोरोनाचा धोका जगावर घोंगावतोय. कोरोनावर अजून  कोणतंही औषध आलेलं नाही. अशात लस येण्यास काही वर्षाचा कालावधी लागतो असं संशोधक म्हणतात. अशात जगभरात कोरोनावर संशोधन सुरु असल्याने कोरोनावरील गोळ्या आणि लस लवकरात लवकर येईल अशी सर्वांनाच आशा आहे. एकट्या भारतात २ लाख ३५ हजारांच्यावर कोरोना रुग्णांचा आकडा गेलाय. यामध्ये दुर्दैवाने अडीच हजारांवर नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. 

BIG NEWS - मुंबईत 3000 खाटांची व्यवस्था केली; मात्र अद्यापही त्या आहेत रिकाम्या.. कारण वाचाल तर धक्का बसेल...
 
कोरोनाबाबत विविध स्तरांवर संशोधनं सुरु आहेत. नक्की हा व्हायरस आहे कसा, यापासून पुरुषांना अधिक धोका आहे की स्त्रियांना, हा व्हायरस स्वतःमध्ये काही बदल करतोय का, हा व्हायरस कोणत्या रक्तगटांना जास्त त्रास देउ शकतो, हा व्हायरस शरीरात फुफ्फुसांवर कसा परिणाम करतो या आणि अशा विविध बाबींवर संशोधन सुरु आहे. यातील आणखी एक इंट्रेस्टिंग संशोधन आता समोर येतंय. संशोधन आहे टकलू माणसांबद्दल. 

अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांनी एक संशोधन केलंय. यामध्ये टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो असा दावा करण्यात आलाय. प्रोफेसर कार्लोस यांच्या अभ्यासानुसार "पुरुषांमधील टक्कल हे नॉवेल कोरोना व्हायरसच्या संसर्गासाठी धोकादायक घटक आहे” असं नमूद केलंय. 

याबाबत मुख्यत्त्वे दोन अभ्यास करण्यात आलेत. पहिला अभ्यास स्पेनमध्ये झाला. ज्यामध्ये ४१ कोरोना रुग्णांचा अभ्यास झाला. यामधील ७१ टक्के रुग्ण हे बाल्ड म्हणजे टकलू होते. आणि दुसरं संशोधन अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत करण्यात आलं. ज्यामध्ये १२२ कोरोना रुग्णांपैकी ७९ टक्के बाल्ड असल्याचं समोर आलं. यावरून संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांनी टक्कल आणि कोरोना यांच्यात संबंध असल्याचा निष्कर्ष काढला जातोय. 

आणखी काही मोठे खुलासे म्हणतात : 
पुरुषांमधील सेक्स हार्मोन्समुळे पुरुषांमध्ये कोरोनासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा प्रभाव कमी ठरतो असं देखील म्हणतात. ज्यामुळे पुरुषांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात होऊ शकतो. याचसोबत पुरुषांमधील रक्तात असे काही खास रेणू असतात जे कोरोना विषाणूंचे सहज वाहक बनतात असं देखील संशोधक म्हणतात. 

you are likely to get corona infection if you are bald read what international researchers are saying


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com