तुम्हाला माहित आहे का? लॉकडाऊमध्ये मुंबईत डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसीस साथीमध्ये किती घट झाली आहे? वाचा बातमी

तुम्हाला माहित आहे का? लॉकडाऊमध्ये मुंबईत डेंग्यू, मलेरीया, लेप्टोस्पायरोसीस साथीमध्ये किती घट झाली आहे? वाचा बातमी
Updated on

मुंबई : कोरोनाचा वार झेलणार्या मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 2016 च्या तुलनेत या वर्षी मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसीसच्या केसेसमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 

दरम्यान, महानगरात सुरुवातीच्या 5 महिन्यात या आजारांचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, 2016 च्या तुलनेत 2020 मध्ये डेंग्यूच्या 68 टक्के, मलेरियाच्या आणि लेप्टोस्पायरोसीसच्या रुग्णांमध्ये 54 टक्क्यांनी घट झाली आहे.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये जानेवारी ते मे पर्यंत महानगरात डेंग्यूचे 114 केसेस समोर आले होते. 2020 मध्ये या केसेस मध्ये घट होऊन केवळ 37 केसेसची नोंद करण्यात आली. अश्याच पद्धतीने 2016 च्या सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये मलेरियाचे 1 हजार 628 रुग्ण समोर आले होते. ज्यात घट होऊन 2020 मध्ये फक्त 753 केसेसची नोंद करण्यात आली. 

तद्य डॉक्टरांच्या मते कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या वर्षी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. शिवाय, सध्या फक्त कोरोनाच्या रुग्णांवरच सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असल्यामूळे या बाकी रुग्णांवर दुर्लक्ष झाले असल्याचे ही तद्यांचे म्हणणे आहे. 

कोरोनासोबत दुसऱ्या रुग्णांवर ही समान लक्ष दिले जात आहे. एकीकडे कोरोनासाठी रुग्णालये दिली आहेत. तर दुसरीकडे इतर रुग्णांसाठी ही रुग्णालये आरक्षित ठेवली आहेत. 

सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे हे जरी आता दिलासादायक चित्र असलं तरी अजून पुर्णपणे पावसाळा सुरु झालेला नाही. ज्यामुळे आता जरी ही संख्या कमी दिसत असली तरी या संख्येत पावसाळा सृरू झाला की वाढ दिसून येईल. त्यामूळे नागरिकांनी सतर्क रहावे. 

डॉ. विक्रांत शाह, संक्रमण रोग विशेषद्य 

तुलनात्मक आकडेवारी 

मलेरिया 

वर्ष केसेस 
2016 1,628
2017 1,417
2018 1,301
2019 968
2020 753


डेंग्यू 

वर्ष केसेस 
2016 114
2017 99
2018 38
2019 55
2020 37

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com