
दुबईहून परतलेल्या कल्याणमधील एका 25 वर्षीय तरूणाला स्थानिक नागरिकांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. आरोग्याची काळजी घे, तुला कोरोना झाला आहे. असे संदेश पाठवून या युवकाला मानसिक त्रास देण्यात येत आहे.
कल्याण : दुबईहून परतलेल्या कल्याणमधील एका 25 वर्षीय तरूणाला स्थानिक नागरिकांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. आरोग्याची काळजी घे, तुला कोरोना झाला आहे. असे संदेश पाठवून या युवकाला मानसिक त्रास देण्यात येत आहे. त्यामुळे या तरुणाने आपच्या (आम आदमी पार्टी) कार्यकर्त्यासह पालिकेचे रुग्णालय गाठले. मात्र, त्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना उपलब्ध नसल्याने, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ही बातमी वाचली का? कोरोनाच्या दहशतीमुळे ...ही निवडणूक ढकलली पुढे!
कल्याण पश्चिमेत राहणारा एक 25 वर्षीय युवक गुरूवारी (ता.13) दुबईहून परतला. त्याची विमानतळावर सर्व तपासणी झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची लागण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, घरी परतल्यानंतर या तरुणाला शेजाऱ्यांनी संदेश पाठवत त्रास देण्यास सुरूवात केली. 14 दिवस घरात एकटाच राहा, बाहेर पडू नको. तुला कोरोना झाला आहे. असे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणाला याचा मानसिक धक्का बसला. याबाबत आम आदमी पार्टीचे रवि केदारे, धनंजय जोगदंड यांनी पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवांगरे याना संपर्क साधला. मात्र त्यांनी कामात व्यस्त असल्याचे सांगितले. त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधून, सर्व घटनाक्रम सांगितला. काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाबाबत पालिका सज्ज असल्याचे सांगितले. मात्र, घडल्याप्रकारानंतर पालिकेच्या उपाययोजना कागदावरच असल्याचे पाहायला मिळत आहे.
ही बातमी वाचली का? कोरोनामुळे अडलंय हापूसचं घोडं, वाचा काय झालंय...
पालिका नागरिकांची दिशाभूल करत असून, केवळ कागदावर उपाययोजना न करता कोरोनाबाबत ठोस भुमिका घ्यावी.
- धनंजय जोगदंड, पदाधिकारी, आम आदमी पार्टी.
ही बातमी वाचली का? प्रियांका चतुर्वेदींच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीनाट्य!
पालिका रुग्णालयामध्ये व्यवस्थित निरोप न पोहचल्याने गैरसमज झाला. पालिका शासन आदेशानुसार उपाययोजना करत आहे. पालिका क्षेत्रातच नव्हे तर राज्यात कुठेही कोरोना निदानावरील साधने उपलब्ध नाही. दुबईहून परतलेल्या युवकाला व्यवस्थित आहे.
- डॉ. राजू लवांगरे, पालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी.