पालघरमध्ये तरुणीची गोळ्या झाडून हत्या; आरोपी तरुणानेही ट्रकसमोर उडी घेऊन दिला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पालघरमध्ये तरुणीची गोळ्या झाडून हत्या; आरोपी तरुणाने ट्रकसमोर उडी घेऊन दिला जीव

पालघर - पालघरमधील बोईसर येथे एका तरुणाने तरुणीवर गोळ्या झाडल्या. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तरुणीवर गोळी झाडल्यानंतर तरुणानेही गाडीखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. (young man shot and killed a girl news in marathi)

हेही वाचा: Relationship: मित्रांना अनफ्रेंड करण्यास गर्लफ्रेंडचा नकार, बॉयफ्रेंडची आत्महत्या

कृष्णा यादव असे आरोपी तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तर मयत मुलगी बिहारची रहिवासी होती. दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. मात्र कशावरून तरी दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर तरुणाने त्याच्याकडे असलेल्या बंदूकीने तरुणीवर गोळ्या झाडल्या.

हेही वाचा: सदावर्ते इज बॅक! भिख्खू संघाची केली थेट 'आरएसएस'ची तुलना; वाद निर्माण होण्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीमा शासकीय रुग्णालयासमोर बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आरोपी कृष्णा यादव तरुणीवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. त्याचवेळी घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर डी डेकर कंपनीसमोर तरुणाने सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाला.

टॅग्स :Mumbai Newscrimepalghar