
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमच्या बाथरूममध्ये तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. हाताची नस कापून घेतलेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात आढळली. तिनं बाथरूमच्या फरशीवर आय एम सॉरी असंही लिहिलं होतं. हाताची नस कापलेल्या अवस्थेत तरुणी सापडल्यानं खळबळ उडाली. अद्याप या प्रकरणी अधिक माहिती समोर आलेली नाही. पोलीसात या प्रकरणी नोंद झाली असून अधिक तपास केला जात आहे.