
दहिसरमधील आजाद नगर परिसरात नशेखोरांनी अक्षरशः हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या त्रासाला स्थानिक नागरिक कंटाळले आहेत. महिलांची छेडछाड, पैशांची जबरदस्ती आणि मारहाण हे लोक करत असल्याचे दिसून आले आहे. यातच आता आता एका निष्पाप तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे.