

मुंबई: चिकन बिर्याणी खाणे कुर्ल्यात राहणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. कारण घशात अडकलेले चिकनचे हाड काढण्यासाठी त्याच्या मानेवर डॉक्टरांना तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. कुर्ल्यातील ३० वर्षीय तरुण घशात सूज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती झाला होता.