

youth kidnapped uncles child
ESakal
डोंबिवली : मामासोबत झालेल्या वादाच्या रागातून मूकबधिर तरुणाने आपल्या आत्याच्या एक वर्षीय मुलाला घरातून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुर्ल्यातील विनोबा भावे नगर परिसरातून बेपत्ता झालेला हा चिमुकला काही तासांतच डोंबिवलीतील कोपर पुलाजवळ सुखरूप अवस्थेत आढळून आला. विष्णूनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे बालकाची ओळख पटवून त्याला आईच्या स्वाधीन करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास विनोबा भावे नगर पोलीस ठाणे करीत आहे.