esakal | चिंता वाढवणारी बातमी: कोरोनामुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण 8 टक्क्यांवर

बोलून बातमी शोधा

Corona Virus
चिंता वाढवणारी बातमी: कोरोनामुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण 8 टक्क्यांवर
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: कोरोनाच्या 'डबल म्युटंट स्ट्रेन' चा परिणाम तरुणांवर अधिक होत असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ही वाढले आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबई-ठाण्यात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 45 वयोगटापर्यंतच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे साधारणता 5 ते 8 टक्के इतके असल्याचे राज्य मृत्यू परीक्षण समिती(स्टेट डेथ ऑडिट कमिटी) अभ्यासात समोर आले आहे.

हेही वाचा: अमित शहा यांना कोरोनाचा प्रार्दुभाव दिसत नाही का?- काँग्रेस

राज्य डेथ ऑडिट कमिटीने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला. मुंबईतील 460 तर ठाण्यातील 340 अशा एकूण 800 मृत्यूंचा अभ्यास यात करण्यात आला. त्यात 45 वयोगटापर्यंतच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे 5 ते 8 टक्के असल्याचे समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. यापूर्वी हे प्रमाण 3 टक्क्यांच्या आत होते.

सध्या नव्याने पसरलेल्या 'डबल म्युटंट स्ट्रेन'मुळे हा बदल झाला असल्याचे ही डॉ सुपे यांनी सांगितले. कोविड च्या पहिल्या लाटेमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये 50 वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू अधिक होते. यावेळी मात्र 45 वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू वाढले आहेत असे डॉ सुपे म्हणाले. हे प्रमाण वाढले असले तरी ते फार वाढलेले नाही,त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे ही डॉ सुपे यांनी सांगितले.

हेही वाचा: फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

'डबल म्युटंट स्ट्रेन' तरुणांवर अधिक आक्रमण करतोय. हा स्ट्रेन सुरुवातीचे 5 तर 7 दिवस काही लक्षणे आणत नाही. तो शरीरात आतल्या आत पसरतो. त्यानंतर तो अचानक आक्रमक पणे वाढत असल्याचे ही डॉ सुपे यांनी सांगितले. यामुळे अनेक रुग्ण काही दिवसांतच गंभीर होत असल्याचे दिसते. यातच अनेक तरुणांचा जीव गेला असल्याचे ही त्यांनी सांगितले.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला असून आता एप्रिल महिन्यातील मृत्यूंचा अभ्यास देखील सुरू करण्यात आला आहे. तरुण आजार अंगावर काढत असल्याचे दिसते. त्यामुळे कुणीही आजार अंगावर न काढता ताबडतोब चाचणी करणे आवश्यक आहे. कामानिमित्त बाहेर फिरणाऱ्या लोकांनी ठराविक कालावधीत आपली चाचणी करायला हवी असे ही डॉ सुपे यांनी सांगितले.