

Zeeshan Siddique Death Threat mumbai
esakal
Zeeshan Siddique Latest News : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर याने व्हॉइस नोटद्वारे ही धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, व्हॉइस नोटचा तपास सुरू केला आहे.