
मुंबई : सध्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कपडे, विविध वस्तू यासह जेवण किंवा किराणा मालाचे सामान देखील ऑनलाइन मागवले जाते. यामध्ये झेप्टो (Zepto), झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) अशा किराणाकार्ट टेक्नोलॉजीज समावेश आहे. मात्र आता ऑनलाइन किराणा डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या झेप्टो कंपनीद्वारे ऑर्डर करताना नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.