इनर इंजिनिअरिंग : संगीत आणि अध्यात्म 

सद्गुरु, ईशा फाउंडेशन 
Tuesday, 13 October 2020

भारतीय शास्त्रीय संगीतात, ज्याप्रकारे ध्वनींचा वापर केलाय - म्हणजे राग, सूर, ताल सर्वकाही, आपण तल्लीन झाल्यास स्वाभाविकपणे आपण ध्यानमय होऊ, कारण भारतीय संस्कृतीची जडणघडणच यापद्धतीने झाली आहे.

तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्यास संपूर्ण अस्तित्व केवळ संगीत आहे, कारण ते फक्त एक कंपन आहे. कंपन आहे, तिथे ध्वनी असलाच पाहिजे. म्हणजेच संपूर्ण अस्तित्व हे असंख्य ध्वनींचं एक अतिशय गुंतागुंतीचं मिश्रण आहे. 

आवाज म्हणजे काय? आपण कोणत्याही ध्वनीला ऑसिलोस्कोपमध्ये, आवाज मोजण्याचं एक साधन, म्हणून पाहिल्यास त्याच्या फ्रिक्वेंसी आणि तीव्रतेनुसार एक आकार तयार होतो. म्हणजेच, प्रत्येक आवाजाचा त्याचा स्वतःचा आकार असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक आकाराचा त्याच्याशी संलग्न असाही आवाज असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास आज आधुनिक विज्ञानानं आपल्याला हे सिद्ध करून दाखवलं आहे, की संपूर्ण अस्तित्व केवळ ऊर्जेचं कंपन आहे. साठ ते सत्तर वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञानाचा फक्त भौतिकतेवर विश्वास होता, परंतु आता नाही. आता विज्ञान स्वतःच भौतिकतेला फारसं महत्त्व देत नाहीये, भौतिकतेचं अस्तित्वाचं आता नाकारत आहे. आज विज्ञान म्हणतं, ‘विश्वात भौतिक म्हणून असं काही नाही, ती केवळ एक काल्पनिक समजूत आहे. संपूर्ण ब्रम्हांड हे एक फक्त स्पंदन आहे.’  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय शास्त्रीय संगीतात, ज्याप्रकारे ध्वनींचा वापर केलाय - म्हणजे राग, सूर, ताल सर्वकाही, आपण तल्लीन झाल्यास स्वाभाविकपणे आपण ध्यानमय होऊ, कारण भारतीय संस्कृतीची जडणघडणच यापद्धतीने झाली आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीचा हेतू केवळ आपली जाणीव उंचावण्याचा होता. पुरातन  काळापासून, लोकांनी भारताचा ‘भारत’ या शब्दाचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी त्याच्याकडं एक शक्यता म्हणून पाहिलं. कारण पूर्ण संस्कृती आणि देशालाच एक अध्यात्मिक प्रक्रिया बनवण्यासाठीची भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच होती. तुम्ही या मातीत जन्म घेतल्यावर आयुष्यात बऱ्याच गोष्टी करू शकता - तुम्ही  करियर करू शकता, तुम्ही संसार स्थापू शकता आणि  आयुष्यात इतर अनेक गोष्टी करू शकता. पण काहीही केलंत, तरी मुळात आपलं जीवन आपण परममुक्ती प्राप्त करण्यासाठीच आहे. मुक्ती हेच एकमेव ध्येय आहे.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळं या संस्कृतीत, संगीत, नृत्य किंवा इतर जे काही तुम्ही केलं ते फक्त एक मनोरंजन नव्हतं, ती एक आध्यात्मिक प्रक्रियाही होती. नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही. तुम्ही शारीरिक स्थिती आणि मुद्रा योग्य प्रकारे वापरल्यास ध्यानमय होऊ शकता. त्याचप्रमाणे, शास्त्रीय संगीतात खोलवर रुजलेली व्यक्ती तुम्ही बघितल्यास ती तुम्हाला एखाद्या संतासारखी दिसते. संगीत म्हणजे कुणीतरी फक्त मनोरंजनासाठी शोधलेले काही ‘जिंग-बँग’ नव्हते. मनोरंजन जीवनाचा दृष्टिकोन नव्हता. प्रत्येक गोष्ट जाणिवेच्या अत्युच्च पातळीवर पोचण्यासाठीची साधना होती. आयुष्यात सर्वकाही, बसणं, उठणं, उभं राहणं, अगदी खाणं-पिणं सुद्धा एक साधना होती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणून, जो योग्यरित्या ऐकतो, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट संगीत आहे. ज्याला ध्वनीच्या पूर्णत्वाचे आकलन होत नाही, त्याच्यासाठी तो गोंगाट आहे. कारण, तो तुकड्यांमध्ये ते अंशत: ऐकत आहे. जो अस्तित्वाच्या पूर्णत्वाला ऐकतो, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट संगीत आहे; त्याच्यासाठी संगीत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलंत, तर या संपूर्ण शरीरात एका मधूर संगीताचं स्पंदन घडत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadguru Isha foundation article about Music and spirituality