esakal | इनर इंजिनिअरिंग : वचनबद्धतेची अलौकिकता 
sakal

बोलून बातमी शोधा

sadguru-isha-foundation

लोकं स्वप्नं पाहण्यास आणि भविष्यातील योजना आखण्यास घाबरतात कारण त्यांची एक मात्र भीती असते आणि ती म्हणजे, ‘जर ते घडलं नाही तर काय होईल?’ ते घडू शकलं नाही, तर काहीही होणार नाही, पण ते घडल्यास अतिशय अद्‍भूत असेल.

इनर इंजिनिअरिंग : वचनबद्धतेची अलौकिकता 

sakal_logo
By
सद्गुरु, ईशा फाउंडेशन

जगात अविश्वसनीय गोष्टी केवळ वचनबद्धतेतून केल्या गेल्या आहेत. याचे विलक्षण उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. अचानकपणे त्यांनी एका गोष्टीसाठी स्वतःला वचनबद्ध केलं. त्यांची वचनबद्धता इतकी प्रचंड होती की एक महामानव बनले. 

मला आठवतं, भारतातल्या त्यांच्या पहिल्या कोर्ट केसबद्दल त्यांनी लिहिलेलं. त्यांनी घेतलेल्या खटल्याची बाजू मांडताना, त्यांना नीट बोलता सुद्धा आलं नाही. यावरून हा माणूस महात्मा गांधी होईल असं वाटतं का? परंतु हाच माणूस पुढं लाखो लोकांचं प्रेरणास्थान बनला. फक्त भारतातच नव्हे, जगात कुठंही तुम्ही त्यांचं नाव घ्या, आणि तुम्हाला फक्त आदर आढळून येईल. आणि हे असं घडलं, जेव्हा भारतात इतर अनेक खरोखर प्रचंड प्रतिभावंत नेते होते. ते अधिक प्रतिभावंत, उत्तम वक्ते आणि उच्चशिक्षित होते. तरी देखील हा माणूस या सर्वांहूनही झळाळून निघाला निव्वळ त्यांच्या वचनबद्धतेपोटी. आयुष्यात हवं ते घडो, जीवन असो की मृत्यू, वचनबद्धता मात्र कधीच ढळता कामा नये. तुम्ही खरोखर वचनबद्धता बाणली की स्वतःला तुम्ही पूर्णपणे व्यक्त करता, शक्य त्या प्रत्येक मार्गानं. वचनबद्धतेचा अभाव असतो, तेव्हा तुम्ही तुमचं ध्येय हरवून बसता. ज्या ध्येयासाठी आम्ही इथं आलो, तेच जर हरवून बसलो की मग ध्येयपूर्तीचा प्रश्‍नच येत नाही. वचनबद्ध असणं ही एक अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या आत ठरवतो. आयुष्यात करण्यासाठी जे काही आपण हाती घेतलं आहे, आपण त्याप्रति खरोखर प्रतिबद्ध आहोत, तर मग त्याची पूर्तता होणार यात शंका नाही. आणि जरी ते पूर्ण झालं नाही, तरी एका वचनबद्ध व्यक्तीसाठी अपयश असं काही नसतं. दिवसातून शंभर वेळा मी खाली पडलो, तरीही उठून परत चालत असेन, तर तेवढं पुरेसं आहे. वचनबद्धता म्हणजे आक्रमकपणा नव्हे. या संदर्भातच महात्मा गांधींचे उदाहरण उल्लेखनीय आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते वचनबद्ध होते, परंतु त्याचवेळी ते ब्रिटीश लोकांविरुद्ध नव्हते. हा पैलू गांधीजींची परिपक्वता दर्शवतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोकं स्वप्नं पाहण्यास आणि भविष्यातील योजना आखण्यास घाबरतात कारण त्यांची एक मात्र भीती असते आणि ती म्हणजे, ‘जर ते घडलं नाही तर काय होईल?’ ते घडू शकलं नाही, तर काहीही होणार नाही, पण ते घडल्यास अतिशय अद्‍भूत असेल. प्रत्येकाकडे स्वप्नं असतात, पण ते वास्तवात उतरवण्यासाठी आपला जीव पणाला लावण्यासाठी कितीजण इच्छुक आहेत. तुम्हाला जे खरोखर मौल्यवान वाटतं ते निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावण्यासाठी प्रचंड धैर्य आणि वचनबद्धता लागते, आजच्या सुखसोयी नाकारून उद्याचं उज्ज्वल भविष्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. आजच्या काळासाठी आणि भावी पिढीसाठी खरोखर काय गरजेचं आहे याची सुस्पष्ट दूरदर्शिता हीच एका सामान्य माणसाला महापुरुष बनविते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top