रताळी व भोपळ्याच्या बिया 

sweet potato
sweet potato

प्रतिकारशक्ती चांगली होण्यासाठी प्रत्येकाच्या पोटात दररोज काही महत्त्वाची पोषकमूल्ये जाणे आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ आणि ‘इ’चा समावेश होतो. त्याचबरोबर लोह, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनिअम, फॉलेट, ओमेगा ३ फॅटी अॅसिड व चांगल्या प्रतीचे प्रोटीनही पोटात जाणे गरजेचे आहे. या इम्युनिटी बुस्टर मालिकेत आपण असे अन्नपदार्थ पाहत आहोत, ज्यात वरीलपैकी एक किंवा अधिक पोषक घटकांचा समावेश आहे आणि ते आपल्या दैनंदिन डाएटमध्ये सहज समाविष्ट करता येतात. 

रताळी 
- रताळी बीटा कॅरोटिनचा उत्कृष्ट स्रोत असून, आपल्या शरीरात गेल्यावर त्याचे रूपांतर व्हिटॅमिन ‘अ’ मध्ये होते. 
- त्यामध्ये तंतुमय पदार्थ आणि अॅन्टिऑक्सिडंट असतात व त्यांमुळे आतड्यामध्ये उपयुक्त जिवाणूंची निर्मितीही होते. 
- या सर्वांमुळे रताळी एक उत्कृष्ट इम्युनिटी बुस्टर ठरतात. 
- रताळी सालीसह खाणे अधिक चांगले. त्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक फायदे होतात. 
- रताळ्यापासूनचे पदार्थ थोड्या तेलामध्ये बनवल्यास ती अधिक फायदेशीर ठरते. कारण, रताळ्यातील बिटा कॅरोटिन हे पोषणमूल्य फॅटमध्ये विरघळणारे असून, पदार्थ तेलात बनवल्यास ते पदार्थामध्ये शोषले जातात. 
- रताळी व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह व कॅल्शिअम आदींचा चांगला स्रोत आहे. 
- त्यामुळे दृष्टिदोष कमी होतो व डोळ्याचे आरोग्य सुधारते. 
- रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, ताण कमी करण्यात व हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यात रताळ्याचा उपयोग होतो. 
- त्यामुळे शरीरातील तीव्र दाहापासून बचाव होतो किंवा तो कमी होतो. 
- रताळी वृद्धांसाठी व वाढत्या वयाच्या मुलांसाठी (विशेषतः प्री-स्कूल) अत्यंत उपयुक्त असतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भोपळ्याच्या बिया 
- भोपळ्याच्या बिया झिंगचा सर्वोत्कृष्ट स्रोत आहे. 
- झिंक हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक असून, तो प्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. 
- त्यामध्ये आहारात आवश्यक फायबर, प्रोटिन्स, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्निशिअम हे घटक विपुल प्रमाणात असतात. 
- अशाप्रकारे झिंकमुळे आपले एकुणच आरोग्य सुधारते. 
- झिंकचे विपुल असलेल्या इतर स्रोतांत तीळ, काजू, बदाम, हरभरा आणि दुधाचा समावेश होतो. 

झिंक बुस्ट शेक

  • दहा ते बारा साल काढलेले बदाम, ५ ते ६ काजू व अर्धा चमचा हरभऱ्याची पावडर घ्या.
  • मिल्कशेक बनविण्यासाठी हे सर्व जिन्नस एक ग्लास दुधामध्ये घाला. तुम्ही त्यात मध, चिमूटभर दालचिनी पावडर व व्हॅनिला इसेन्स घालू शकता.  
  • त्यावर एक चमचा भोपळ्याच्या बिया टाका व हे झिंक बुस्ट शेक एन्जॉय करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com