esakal | लाइफस्टाइल कोच : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...
sakal

बोलून बातमी शोधा

Exercise

जगभरात सुरू असलेल्या ‘कोविड १९’ या विषाणूच्या साथीविरुद्ध सर्वोत्तम प्रतिकारशक्ती हे सर्वांत चांगले शस्त्र आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या प्रतिकारशक्तीवर व्यापक परिणाम होत असतो. आता येथून पुढे प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या हेतूने जीवनशैली आखली पाहिजे.

लाइफस्टाइल कोच : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

जगभरात सुरू असलेल्या ‘कोविड १९’ या विषाणूच्या साथीविरुद्ध सर्वोत्तम प्रतिकारशक्ती हे सर्वांत चांगले शस्त्र आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या प्रतिकारशक्तीवर व्यापक परिणाम होत असतो. आता येथून पुढे प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या हेतूने जीवनशैली आखली पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 • सकारात्मक राहा. आशावाद ठेवा.
 • मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा आदींसारख्या ‘रिस्क फॅक्टर्स’वर नियंत्रण ठेवण्याचा, धोका कमी करण्याचा प्रयत्न करा. 
 • रोग प्रतिकारशक्ती वाढवणे.  
 • कोरोनापासून सुरक्षिततचे सर्व उपाय करा. हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क 
 • संतुलित, घरगुती आहार घ्या. क्रॅश डाएट नको. त्याचप्रमाणे, जेवण चुकवू नका. जंकफूड तसेच अधिक प्रक्रियायुक्त आहार टाळा.

संतुलित आहार
दररोजच्या आहारात खालील प्रमुख पोषक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

 • अ जीवनसत्त्व : रताळे, गाजर, पालक इ.
 • क जीवनसत्त्व : आवळा, सिमला मिरची, लिंबू इ.
 • ड जीवनसत्त्व : सूर्यप्रकाश, अंडी, मासे इ.
 • ई जीवनसत्त्व : बदाम, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे इ.
 • झिंक : भोपळ्याच्या बिया, तीळ, बदाम इ.
 • प्रथिने : सोयाबीन, मिश्र डाळी, पनीर, हरभरे, अंडी, मासे, चिकन इ.
 • ओमेगा : ३ फॅट्टी ॲसिड : जवस, अक्रोड, मासे, सब्जाची बी इ.

भारतीय मसाले
हळद, मिरपूड (काळी मिरी पावडर), आलं, लसूण इ. आतड्याच्या आरोग्यासाठी

 • पुरेसे पाणी पिणे
 • निर्जुंतीकरण
 • आहारात प्रिबायोटिक आणि प्रोबायोटिक फूड्‌स घेणे. (फळे, ओट्‌स, चीज, दही इ.)

गाढ, शांत झोप

 • दररोज सात ते आठ तास कोणत्याही अडथळ्याशिवायची गाढ, शांत झोप महत्त्वाची असते.

तणावमुक्त जीवन

 • नियमित ध्यान
 • प्राणायाम
 • नियमित व्यायाम
 • संतुलित आणि वेळेवरचा आहार
 • मध्यम तीव्रतेचा व्यायाम

दररोज किमान ४५ ते ६० मिनिटे चालावे. दररोजच्या व्यायामात छातीचा विस्तार करणाऱ्या तसेच श्वसनाच्या व्यायामाचाही समावेश करावा.  

loading image