हेल्थ टिप्स - पावसाळ्यातील आरोग्य

Rainy-Health
Rainy-Health

पावसाळ्याचा हवाहवासा वाटणारा श्रावण महिना सुरू झाला आहे. हिरवागार निसर्ग, रिमझिम पावसाच्या सरींमुळे श्रावणाचे सौंदर्य वेगळेच असते. मात्र श्रावणात प्रकृतीची काळजी घेणेही आवश्यक असते. यंदा कोरोनाच्या साथीमुळे ही गरज आणखी वाढली आहे. मुले आणि वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घ्यावी. मॉन्सून आपल्यासोबत अनेक समस्याही घेऊन येतो. या ऋतूमध्ये विविध आजार व संक्रमण पसरण्याचा धोका असतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळ्यातील आजार
पावसाळ्यात साधारणतः सर्दी -खोकला, टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी आजार  सहजपणे पसरतात.  त्याचप्रमाणे या हंगामात बुरशी आणि जीवाणूमुळे त्वचा विकारांना ही निमंत्रण मिळते. या ऋतूत डास, अन्न आणि दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे रोग होतात. आरोग्य सांभाळून पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी या काही खास टिप्स. 

लसीकरण आणि स्वच्छता
सध्या कोरोनाच्या लसीची आपण सगळेजण वाट पाहत आहोत. मात्र, पावसाळ्यातील इतर काही आजारांवर लसी उपलब्ध आहेत. त्या घेऊन या आजारांपासून स्वत:चे व स्वतःच्या कुटुंबियांचे रक्षण करावे. याशिवाय, घर व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.  

हात धुणे
कोरोनापासून बचाव करण्यासाठी दिवसभरात वारंवार साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुण्याचा सल्ला सतत दिला जातोय. पावसाळ्यातील इतर रोगांपासून बचाव करण्यासाठीही हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत. त्यामुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत होते.

ताजे अन्न खाणे
पावसाळ्यात ताजे अन्न आणि खाद्यपदार्थ आहारात असावेत. फ्रिजमधील अन्नाचा किंवा  शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत. त्याचप्रमाणे  चव किंवा गंधामध्ये बदल झालेले अन्नही टाळावे.  या हंगामात कच्चे अन्न किंवा कोशिंबीरींचे सेवनही कमीच करावे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com