चेतना तरंग : चेतनेचा विस्तार होऊ द्या...

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
Tuesday, 5 May 2020

बुद्ध शिखरावर नाहीत, उलट शिखर त्यांच्या खाली आहे. जो शिखर गाठतो, तो परत खाली येतो. पण अधिक उंचीवर, आपल्या अंतरात्म्यामध्ये स्थित असतो, त्याचा शोध शिखरच घेते. शिवाला चंद्रशेखर म्हणतात. त्याचा अर्थ शिवमय मन इंद्रियांच्या पलीकडे, त्रिगुणातीत आणि सर्वकाळ शिखरावर असते. लोक जेवणावळी आणि उत्सवामागे धावतात, पण त्यांच्यामागे न धावणारे लोक कुठेही गेले तरी त्यांच्यामागे मेजवान्या आणि उत्सव जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चैतन्य
शरीराच्या स्तरातील चेतना उत्तेजक असते. जी सुखास कारणीभूत ठरते. चेतना आकुंचित होते तेव्हा दुःख आणि कष्ट निर्माण होतात. कष्ट होणे म्हणजे चेतना आकुंचित किंवा संकुचित होणे. चेतना शरीराच्या ठराविक मार्गातून प्रवाहित होते, त्यावेळी सुखाचा अनुभव येतो. उत्तेजनेमुळे होणारा आनंद पुन:पुन्हा उपभोगल्यास जडत्व आणि मलूलता येते. बहुतेकवेळा स्वयंपाक्यांना स्वतःच शिजवलेले अन्न आवडत नाही. एकच संगीत वारंवार ऐकल्याने त्याची मजा जाते. लैंगिक व्यापार करणाऱ्यांना लैंगिकतेत सुख मिळत नाही. उत्तेजनेवर नीट लक्ष दिल्यास चेतनेचा विस्तार होतो व शांती निर्माण होते. सजगतेमुळे उत्तेजना तिचे अस्तित्व गमावते. तिचे अस्तित्व आहे किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. सूर्यप्रकाश असतो तेव्हा मेणबत्ती पेटलेली आहे किंवा नाही, याने काही फरक पडत नाही. सर्व सुखे फक्त उत्तेजक आहेत आणि तुम्ही उत्तेजकापेक्षा जास्त काही आहात याची जाणीव मुक्तीचा अनुभव देते. वेदना ही दुसरी काही नसून, चेतनेचा विस्तार पावण्याची आणि मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. मुक्ती म्हणजे उत्तेजनेच्या लालसेपासून स्वतंत्रता. दु:ख ही कायम स्थिती नाही. चेतनेची नैसर्गिक प्रवृत्ती परमानंदासाठी विस्तार पावण्याची आहे. उताराकडे वाहणे ही पाण्याची आणि दबावाखाली राहणे, ही हवेची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

त्याचप्रमाणे, विस्तार पावणे आणि शांत राहणे ही चेतनेची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. निद्रानाशाचा आजार असणारी व्यक्ती झोपायचे कसे हे विसरलीय, त्याचप्रमाणे आपल्यापैकी बहुतेकजण शांत आणि आनंदी कसे राहायचे, हे विसरले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Sri Sri Ravi Shankar