esakal | योग ऊर्जा - सोपी आसने देतील अगणित फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

सूर्यनमस्कारही केल्यास सर्वांगीण व आणखी फायदेशीर असा सराव राहील.रोज फक्त शरीर मोकळे राहावे याकरिता ही आसने करणे गरजेचे आहे.योग प्रशिक्षकांकडून  प्राणायाम आणि क्रिया शिकणे व नियमित सराव करणे गरजेचे आहे

योग ऊर्जा - सोपी आसने देतील अगणित फायदे

sakal_logo
By
देवयानी एम

कोणतीही गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून केली पाहिजे. योगासनातही विविध आसने, ती करण्याची योग्य पद्धत, प्राणायाम, त्यांचा उद्देश, विविध क्रिया, त्यांचा उपयोग, योग्य शिथिलीकरण, त्याचे फायदे, ध्यान हे सर्व अर्धवट माहितीने, व्हिडिओ बघून न करता योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावे. कारण प्रत्येक व्यक्तीची गरज व प्रकृती तज्ज्ञ गुरूंना समजत असल्याने ते योग्य मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही खूप प्रवास करत असाल, कुठे जाऊन शिकण्यासाठी पुरेसा वेळ नसेल किंवा जवळपास योगासनाचा क्लास नसल्यास कोणती आसने व प्राणायाम रोज झालेच पाहिजे ते पाहू. हे अगदी प्राथमिक प्रकार आहेत, जे अंग मोकळे ठेवण्याइतपतच मदत करतील. इतर आरोग्याच्या फायद्यांसाठी उरलेली आसने, प्राणायाम, क्रिया शिकून करावीत. 

ब्रह्ममुद्रा - 
- मान, खांदे व पाठीच्या वरच्या बाजूतील ताण व कडकपणा कमी होतो. 
- मज्जासंस्था शांत होते, ताण कमी होतो. 
- मन शांत होते व एकाग्रता वाढते. 
- दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी किंवा खूप ड्रायव्हिंग करणाऱ्यांनी ब्रह्ममुद्रा दर दोन-तीन तासांनी करावी. 

तुमची पचनाची तक्रार आहे? जाणून घ्या, पचनक्रियेची माहिती

पर्वतासन - 
- पोश्चर सुधारते. 
- पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 
- श्‍वसन संस्था सुधारण्यास मदत होते. 
- शरीरातील ताण कमी होतो. 
- मेरुदंडातील डिस्कचे आरोग्य दीर्घकाळ टिकते. 
- दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांनी दर दोन-तीन तासांनी पर्वतासन करावे व ३० ते ६० सेकंद त्या स्थितीत राहावे. 

अर्ध कटिचक्रासन - 
- छातीचे स्नायू ताणले जातात व त्यांचे रक्ताभिसरण सुधारते. 
- पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. 
- बद्धकोष्ठतेसाठी उपयुक्त. 
- पाठ दुखी कमी होते. 
- श्‍वसन संस्थेचे कार्य सुधारते. 

पचनक्रियेतील विकार : बद्धकोष्ठता

पवनमुक्तासन - 
- पचनसंस्थेचे कार्य सुधारते. 
- आतड्यांना मसाज मिळतो. 
- पोटातील गॅस व बद्धकोष्ठतेसाठी उत्तम आसन. 
- पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. 
- कंबर दुखीसाठी आरामदायक. 

हेही वाचा : नेटका सडपातळू...!

भुजंगासन - 
- पाठीचा कणा लवचीक राहतो, त्याचे रक्ताभिसरण सुधारते. 
- पचनसंस्थेचे कार्य सुधारते. 
- खांदे, छाती व पाठीचे स्नायू ताणले जातात. 
- श्वसन संस्थेचे कार्य सुधारते.- सायटिकासाठी आरामदायक आसन.- एकंदरीत तणाव कमी होतो. 
- श्‍वासासंबंधीचे विकार असलेल्यांनी भुजंगासन जरूर करावे. 

शवासन - 
- दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्त्वाचे आसन. 
- आसनांचा सराव झाल्यावर शवासन अत्यावश्यक आहे. 
- संपूर्ण शरीर व मेंदूला आराम मिळतो, ताण कमी होतो. 
- विविध आसनांमध्ये शरीरात जे काही बदल घडतात त्यानंतर सर्व इंद्रिये पूर्ववत होणे गरजेचे आहे, ते शवासनात होते. 
- प्राणायामासाठी शरीर व मन तयार होते. 
- आसनांच्या सरावानंतर शवासन केल्याशिवाय आपल्या कामाला लागू नये. 
- रक्तदाब कमी होण्यास मदत होते. 

भ्रामरी प्राणायाम - 
- बसून किंवा पाठीवर पडून देखील भ्रामरी करता येते. 
- ताण, चिडचिड, राग, एन्झायटी, एकंदरीत मानसिक उत्तेजन कमी होते. 
- डोकेदुखी, मायग्रेन कमी होते. 
- शरीर-मन पूर्णपणे शांत होते. 
- उच्च रक्तदाब कमी होतो. 
- हॉर्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. 
- शरीरातील प्रत्येक अवयव, आंतर इंद्रिये, मेंदू, रक्त वाहिन्या शांत होतात. 
- मेंदूतील विचार कमी होत हळूहळू बंद होण्यास मदत होते. 

या सर्वांच्या जोडीला सूर्यनमस्कारही केल्यास सर्वांगीण व आणखी फायदेशीर असा सराव राहील. रोज फक्त शरीर मोकळे राहावे याकरिता ही आसने करणे गरजेचे आहे. परंतु योग प्रशिक्षकांकडून इतर आसने, प्राणायाम आणि क्रिया शिकणे व नियमित सराव करणे गरजेचे आहे.

loading image
go to top