प्रोटिन्सचा खजिना : बीन्स 

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 15 September 2020

सोयाबीन्स हा प्रोटिन्ससाठी अतिशय उत्तम स्रोत. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्लँट कंपाउंड्स इत्यादी घटकांचाही त्याच्यात समावेश असतो- ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.

प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं रोज पोटात गेली पाहिजेत. या पोषकद्रव्यांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ यांचा समावेश असतो. याचबरोबर आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, सेलेनिअम, फोलेट आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि चांगल्या दर्जाची प्रोटिन्स हीदेखील आवश्यक आहेत. या इम्युनिटी बूस्टर मालिकेत आपण असे पदार्थ बघत आहोत, ज्यांच्यामध्ये यापैकी एक किंवा जास्त पोषकद्रव्यं आहेत आणि जे तुमच्या रोजच्या आहारात सहजपणे समाविष्ट करता येतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रोटिन्स 
- प्रोटिन्स आपल्या प्रतिकारशक्तीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. 
- प्रोटिन्स आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमधला महत्त्वाचा घटक आहे. केस आणि नखं ही बहुतांश प्रोटिन्सनी बनलेली असतात. टिश्‍यूज म्हणजे ऊती तयार करण्यासाठी आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी तुमचं शरीर प्रोटिन्सचा वापर करतं. एन्झाइम्स, हार्मोन्स आणि शरीरातली इतर रसायनं तयार करण्यासाठीसुद्धा प्रोटिन्सचा उपयोग करून घेतला जातो. हाडं, स्नायू, कूर्चा (कार्टिलेज), त्वचा आणि रक्त इत्यादी घटक तयार होण्यामध्येही प्रोटिन्स महत्त्वाचा घटक असतो. 

- प्रत्येकानं रोज चांगल्या दर्जाच्या आणि चांगल्या प्रमाणात प्रोटिन्स असलेल्या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. 

- प्रोटिन्सचं चांगलं प्रमाण असलेले पदार्थ : पनीर, दही, दूध, कडधान्ये, सुका मेवा आणि वेलवर्गीय भाज्यांच्या बिया, मसूर. 

बीन्स  
- अतिशय पोषक असूनही काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या घटकांपैकी एक म्हणजे बीन्स. 
- बीन्समध्ये फायबर्स, प्रोटिन्स; बी आणि अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 
- आपल्या भारतीय खाद्यजीवनात आपण रोजच्या आहारात बीन्सचा नक्कीच समावेश करू शकतो आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसह इतर अनेक फायदे मिळवू शकतो. 
- आपण मुख्य जेवणात किंवा इतर वेळच्या खाण्यांमध्ये या बीन्सचा वापर करू शकतो. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीन्स 
सोयाबीन्स हा प्रोटिन्ससाठी अतिशय उत्तम स्रोत. त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्लँट कंपाउंड्स इत्यादी घटकांचाही त्याच्यात समावेश असतो- ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात. या सोयाबीन्सचं नियमित सेवन कर्करोगाचा धोका कमी करणं, हृदयाचं आणि हाडांचं आरोग्य सुधारणं, चयापचय वाढवणं आदींसाठी परिणामकारक ठरू शकतं. अर्थात, सोयाबीन्स आणि त्याच्याशी संबंधित काही पदार्थांमुळे काहींमध्ये आतड्यांवर आणि थायरॉईडच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोयाबीन्स किंवा सोयाबीन्स असलेले पदार्थ नियमितपणे खाण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

छोले/काबुली चणे 
छोले किंवा काबुली चणे हासुद्धा पोषक घटकांचा खजिनाच असतो. छोले जगभरात लोकप्रिय आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्यविषयक किती तरी फायदे मिळू शकतात. प्रोटिन्स तर त्यांच्यात असतातच, शिवाय डाएटरी फायबर्स, मॅग्नेशिअम, आयर्न, फोलेट आणि फॉस्फरस, उपयुक्त व्हिटॅमिन्स आदी भरपूर प्रमाणात असतात. ते चांगली अँटी-ऑक्सिडंट्सही उपलब्ध करून देतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेंगदाणे 
शेंगदाण्यांमध्ये (पीनट्स- लेग्युम्स) मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरतात. पाण्यात भिजवलेले शेंगदाणे हे अतिशय पोषक असतात. 

बीन्सची आणखी उदाहरणं म्हणजे 
- मटार (ग्रीन पीज)- राजमा (किडनी बीन्स) 
- काळे चणे (ब्लॅक बीन्स) 
- पावटा (लिमा बीन्स) 
- चवळी (ब्लॅक-आइड बीन) 
- महत्त्वाची सूचना : ज्या लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी आहेत त्यांनी हे सगळे बीन्स खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr manisha bandishti article about proteins beans