धोक्याची तीव्रता आणि निश्चलतेची तीव्रता 

sadguru-isha-foundation
sadguru-isha-foundation

बहुतेक लोक धोका असतो तेव्हाच प्रखर बनतात. तुम्ही कार चालवत आहात आणि प्रति तास १२० मैलाने जात आहात. तुम्ही खरोखर अशा सुसाट वेगाने जात आहात, तेव्हा अचानक तुमच्या मार्गात काहीतरी येते. संभाव्य अपघाताआधीचे ते शेवटचे काही क्षण, तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात, एकतर ब्रेक, चिंताक्रांत किंवा तुमच्यासमोर जे काही आहे ते टाळण्याचा प्रयत्न करता. समजा तुमची टक्कर झालीच नाही आणि तुम्ही जिवंत आहात, आज इथे बसलेले आहात. तरीही, ते काही क्षण तुम्ही कधीही विसरू शकत नाही. त्या क्षणांची तीव्रता इतकी जबर होती की, जर तुम्ही त्याबद्दल आत्ता विचार केल्यास ते सर्वकाही जणू पुन्हा तुमच्यात पूर्णपणे जिवंत होतं. 

समजा तुम्ही एका उंच इमारतीच्या टोकावर उभे आहात, अगदी आता खाली पडणार आहात. तुम्ही किती तीव्र होता पाहिलेय का? खाली पडण्याचा परिणाम काढून टाकला, तर खाली पडणे ही एक अतिशय विलक्षण गोष्ट आहे, नाही का? कारच्या अपघाताचा परिणाम काढून टाकला, तर तुम्हाला दररोज टक्कर करावीशी वाटेल. मात्र, तुमच्या कारची तोडफोड होते, तुमच्या शरीराची तोडफोड होते, म्हणून तुम्ही ते टाळता. समजा हे दुष्परिणाम दूर केले, तर तुम्हाला हे निरंतर अनुभवायला नाही आवडणार का? सर्व साहसी खेळ, तुम्हाला काय वाटते, ते काय आहेत? दुष्पपरिणामरहित अपघात...तुम्ही विमानातून उडी घेता, अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही पॅराशूट उघडता. तुम्हाला खाली पडण्याचा अनुभव घ्यायचा आहे, कारण तो तुम्हाला इतका तीव्र करतो. 

म्हणून सामान्यत: केवळ धोक्याच्या क्षणातच लोकांना तीव्रतेची जाणीव होते. आता मी जे काही बोलतो आहे, ते म्हणजे डोंगर माथ्यावरून उडी मारणे, किंवा तुमची गाडी धडकवणे किंवा इतर काहीतरी करणे अशा प्रकारच्या गोष्टी न करता, केवळ इथे निश्चल बसून तुमच्या तीव्रतेच्या शिखरापर्यंत पोचणे. तुम्ही अशाप्रकारे प्रखर होऊ शकल्यास तुम्ही डोळे बंद केल्यास त्यांना उघडण्याची देखील गरज संपूर्ण आयुष्यभर उद्भवणार नाही, कारण जीवन इतक्या प्रचंड प्रखरतेने घडते. लोक त्यांचे डोळे बंद करतात आणि दीर्घ काळासाठी ते उघडत नाहीत, ते काही यामुळे नाही की त्यांना जीवनात रस नाही, तर सहज निश्चल बसून जीवन ते इतक्या अत्युच्च तीव्रतेने अनुभवतात. इतर काहीही करण्याची त्यांची इच्छाच होत नाही, एवढेच. 

लोक विचार करतात की, कोणी ध्यान करीत आहे याचा अर्थ तो निष्क्रिय बसून आहे. निष्क्रियता म्हणजे जीवनाची तीव्रता कमी करणे. ध्यान म्हणजे जीवनाची तीव्रता कमी करणे नाही. ध्यान म्हणजे जीवनाला उच्च शिखरावर घेऊन जाण्याबद्दल आहे. तुम्ही अशा प्रखर अवस्थेत असल्यास तुम्ही करू शकणारी ही एक अतिशय रोमांचकारी गोष्ट आहे - तेही फक्त बसून. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिव शंकर असे हजारो वर्षे निश्चल बसून राहिले, कारण ते अशा तीव्रतेच्या शिखरावर आहेत. उठून काहीतरी करावे, अशी इच्छाही त्यांना झाली नाही. म्हणून तुमचा ‘व्होल्टेज’ वाढल्यास स्वाभाविकपणे बघण्यासारखे सर्वकाही तुम्हाला दिसेल. कारण त्याने त्याचे ‘व्होल्टेज’ खरोखर अगदी उंच नेले आणि तेव्हा त्याचा तिसरा डोळा उघडला. ‘तिसरा डोळा’ याचा अर्थ कपाळावर पडलेली एक फट नव्हे. याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी इतर पाहू शकत नाहीत त्या त्याच्यासाठी उपलब्ध झाल्या. तुम्ही तुमचे ‘व्होल्टेज’ वाढवल्यास ते तुम्हालाही उपलब्ध होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com