चेतना तरंग :  स्वरूप पाहा...

Sri sri ravishankar
Sri sri ravishankar

तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावाहून दहा जण दुसऱ्या गावी पायी चालले होते. त्यांना मार्गावर एक नदी ओलांडावी लागली. दुसऱ्या तीरावर पोचल्यावर त्यांना खात्री करून घ्यायची होती की सर्व जणांनी नदी पार केलीय.  प्रत्येकाने स्वत-ला सोडून नऊ जणांना मोजले. ते एकदम भ्रमिष्टासारखे झाले आणि दहाव्या व्यक्तीसाठी रडू लागले. एक सुज्ञ माणूस तिकडून आला आणि त्याने विचारले, ‘‘माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही का रडत आहात?’’ ते उत्तरले, ‘‘आम्ही दहा जण होतो पण आता फक्त नऊ जणच आहोत.’’ सुज्ञ माणसाने पाहिले की, ते दहा आहेत आणि त्यांना उभे करून मोजायला सांगितले.  शेवटच्या माणसाला तो म्हणाला, ‘‘तू दहावा आहेस.’’  त्या सर्वांना दहावा माणूस मिळाल्यावर खूप आनंद झाला. पंचेंद्रिये आणि चार शक्ती (मन, बुद्धी, स्मृती आणि अहंकार), हे आत्मा दिसला नाही की, विलाप करतात. मग गुरू येतो आणि दाखवतो की, तुम्हीच दहावे आहात. मोजत राहा पण दहावा सापडल्याशिवाय थांबू नका. अंतर्यामी नेहमी असणाऱ्या आत्म्याचा शोध सर्वांना खरोखर आनंददायी करतो.

तुमचा विकास होतोय का? तुमचा विकास होत असल्यास तुम्ही स्वत्वामध्ये नाही; पण, तुम्ही स्वत्वाच्या बाहेरही नाही, कारण स्वत्वाच्या बाहेर कशाचेही अस्तित्व असू शकत नाही. सहा प्रकारच्या विकृतींचे स्वत्वामध्ये अस्तित्व नसते. 

प्रसरण - प्रसरण पावण्यात हे गृहीतच आहे की काहीतरी आहे की त्यात प्रसरण क्षमता आहे. प्रसरण पावते ते प्रसरणाचे मूळ होऊ शकत नाही.

आकुंचन - आकुंचन म्हणजे, दुसऱ्या कशातून तरी काहीतरी आकसले जाते. स्वत्व कशातून अंग काढून घेत नाही किंवा कशातून आकसत नाही, म्हणून आकुंचन स्वत्वामध्ये असत नाही.

वृद्धी - जे आधीपासून अस्तित्वात नाही, ते होण्याची प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. स्वत्व हे नेहमी एकसारखेच असते, म्हणून त्याची उत्क्रांती होत नाही.

क्षय - स्वत्वामध्ये अधोगती किंवा ऱ्हास नाही. ते जुने किंवा शिळे होत नाही. त्यामुळेच तुम्ही स्वत्वाच्या जवळ असल्यास तुम्हाला तुमचे वय वाढत आहे, असे वाटत नाही.

अनादी - स्वत्वाला सुरुवात नाही. देवाला सुरवात असेल तर तो देव नाही.

अभाव - स्वत्वामध्ये कशाचाही अभाव नाही. अभावाच्या ठिकाणी पूर्णत्व नसते. स्वत्वात अभाव नाही, ते पूर्ण आहे. अभाव दर्शवतो की कसलेसे अस्तित्व त्याच्या बाहेर आहे, जे स्वत्वामध्ये नाही. 

त्यामुळे तुमची अजिबात प्रगती झाली नाही असे वाटत असल्यास काळजी करू नका, तुम्ही स्वत्वाच्या जवळ आहात. जेव्हा तुमचे मन स्वत्वाबरोबर असेल, तेव्हा तुम्ही उत्क्रांतीची काळजी करत नाही. तुम्ही उत्क्रांतीचा विचार करत असल्यास तुम्ही मनात अडकलात. मन हे जडाचाच भाग आहे आणि जडाची वृद्धी आणि ऱ्हास होतो. आकुंचन-प्रसरणाचा अनुभव हा केवळ मनाचा खेळ आणि दिखावा आहे. तुमची अजूनही उत्क्रांती होत आहे का? शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com