चेतना तरंग : प्रेम म्हणजे काय?

sri-sri-ravishankar.
sri-sri-ravishankar.

आपले हदय खूप जपून ठेवा. ते खूप नाजूक असते. छोट्या छोट्या गोष्टी आणि घटनांचे त्याच्यावर गंभीर परिणाम होतात. ज्ञान आणि विवेकाच्या कोंदणामुळे आपले हृदय दिव्यत्वाशी जोडलेले राहू शकते. मन आणि हृदय साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी दिव्यत्वाशिवाय दुसरे उत्तम काहीही नाही. मग व्यतीत होणारा काळ आणि घटना यांचा त्यांना स्पर्श होणार नाही व जखमाही करू शकणार नाही. 

चेतना तरंग : अवतार हृदयाचाच भाग

एखादी व्यक्ती अतिशय प्रेम व्यक्त करते, तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी, हे आपल्याला समजत नाही. खरेखुरे प्रेम मिळविण्याची क्षमता प्रेम दिल्याने, प्रेम वाटल्याने प्राप्त होते. तुम्ही केंद्रित झाल्यावर तुमच्या अनुभवांच्या आधारावर प्रेम निव्वळ भावनाच नसून प्रेम तुमचे शाश्वत अस्तित्व असल्याचे ज्ञात होईल. मग कोणी कितीही प्रेम, कोणत्याही रूपात व्यक्त केले तरी तुम्ही स्वत:ला आपल्या स्वचेतनेत स्थिर असलेले पाहाल. 

प्रेमाचे तीन प्रकार 
१. आकर्षणाने मिळणारे 
२. सुखसुविधेमुळे मिळणारे 
३. दिव्य प्रेम 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आकर्षणाने मिळणारे प्रेम क्षणिक असते; कारण ते अज्ञानामुळे वा मोहामुळे निर्माण होते. यामध्ये आकर्षण कमी होण्यासोबत मोहभंग होतो आणि तुम्हाला उबग येते. हळूहळू प्रेम कमी होत जाऊन त्याजागी भीती, अनिश्चितता, असुरक्षितता आणि औदासिन्य येते. सुखसुविधेमुळे तयार झालेल्या प्रेमात घनिष्ठता असते, परंतु जोश, उत्साह आणि आनंद नसतो. उदा. आपण आपल्या नवीन मित्रापेक्षा जुन्या मित्राशी खूप आरामदायक आणि मोकळीक अनुभवतो. आपण त्यांना सुपरिचित असतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या दोन्हींपेक्षा दिव्य प्रेम उत्कृष्ट आहे. ते सदाबहार आणि नितनवीन राहते. जवळ जाल तितके ते आकर्षक आणि गहन होत जाते. याचा कधीही कंटाळा येणार नाही, उलट ते प्रत्येकाला उत्साही ठेवते. प्रापंचिक प्रेम सागराप्रमाणे असते; पण सागरालादेखील तळ आहेच ना? दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे आहे- असीम, त्याला कोणतीही सीमा नसते. सागराच्या तळाऐवजी असीम आकाशात भरारी मारा. दिव्य प्रेम कोणत्याही नाते-संबंधापेक्षा श्रेष्ठ आणि सर्व नातेसंबंधांना सामावून घेणारे असते. 

पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com