साक्षात्काराचा ऋतू... 

साक्षात्काराचा ऋतू... 

जगातील खूप कमी लोक तुमची आंतरिक उन्नती जाणू शकतात, मात्र तुमचे बाह्य आचरणच सगळ्यांच्या नजरेत भरते. कधीही लोक आपल्याला समजून घेत नाहीत, म्हणून चिंता करू नका. ते फक्त तुमच्या विचारांचे प्रदर्शनच पाहू शकतात. पाण्याकडे पाहा. पडणारे पाणीही सुंदर आहे, खडक पडतो तेव्हा त्याच्या ठिकऱ्या उडतात, पाणी पडते तेव्हा ऊर्जा आणि सौंदर्यनिर्मिती होते. ‘कुणीतरी असणे’ हे खडक असण्यासारखे आहे. ‘कुणीच नसणे’ हे पाणी असण्यासारखे आहे. ‘सर्वकाही असणे’ म्हणजे पाण्याची वाफ असणे आहे. 

साक्षात्कार 
सदाहरित नारळाच्या वृक्षाप्रमाणे साक्षात्काराला ऋतू नसतो. काही वेळा असा प्रश्न उद्भवतो की, एखाद्याची वागणूक बदलत नसल्यास या सर्व कोर्सेसचा उपयोग काय? पण प्राणिमात्राने मिळवलेले ज्ञान हे त्याच्या बाह्य वागणुकीवरून मोजता किंवा पारखता येत नाही. एखादी व्यक्ती अशी वागते की, ती सर्वज्ञानी आहे. मात्र, आतून ती तशी नसते. एखाद्या व्यक्तीत काहीच बदल झालेला दिसत नसेल, तरीही त्याने बरेच काही ग्रहण केले असू शकेल. सामान्य माणूस फक्त वागणुकीकडे पाहतो. बुद्धिमान वागणुकीपलीकडे पाहतो आणि चैतन्याचा खेळ पाहून चकित होतो. आपली वर्तणूक संबंधावर परिणाम करते. मनोवृत्ती वर्तणुकीवर परिणाम करते. ज्ञान किंवा त्याकडे दुर्लक्ष मनोवृत्तीवर परिणाम करते. 

कृपादृष्टी ज्ञान वाढवते. आतून तुम्ही एखाद्या वृक्षाप्रमाणे असता - काही ऋतूत रुक्ष तर इतर वेळी बहरलेले. सदाहरित नारळाच्या झाडाप्रमाणे, साक्षात्काराला ऋतू नसतो. तो वर्षभर फळे देतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com