चेतना तरंग  : ध्यान आणि आहार 

ravishankar
ravishankar

आहार शरीराच्या पोषणाबरोबरच मनाच्या सजगतेवरही परिणाम करतो. म्हणूनच तुम्ही तुमचे अन्न, शरीर आणि तुमच्या मनाबद्दल समजून घ्यायला हवे. आपल्या शरीराला एखाद्या वाद्याप्रमाणे रोज तेलपाणी करण्याची गरज असते. अन्यथा काही काळानंतर खाण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराच्या गरजेबद्दल अज्ञान, दगदग आणि अशांत झोप, वर्षानुवर्षे शरीर व मनाकडे झालेले दुर्लक्ष आदीने आजार जडतात. ध्यानाला बसल्यावर झोप येत असल्यास तुमचे अन्न हे कारण असू शकते. आहाराबद्दलचे थोडेफार ज्ञान तुमच्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये आणि आयुष्यात बदल आणू शकते. आपली मानसिकता बऱ्याच अंशी आपल्या आहारावर अवलंबून असते. 

आयुर्वेदात ढोबळ मानाने तीन भाग केले आहेत - वात, कफ व पित्त. मनाच्या अवस्थेनुसार तम, रज आणि सत्त्व असे तीन गुण आहेत. हे तीन गुण आणि तीन दोष जसे एकत्र येतात त्याप्रमाणे आपले व्यक्तीमत्त्व, स्वभाव, शरीरयष्टी आणि खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ठरतात. 

सात्त्विक, राजसिक व तामसिक व्यक्तींची वैशिष्ट्ये 
- सत्त्वगुण म्हणजे शांतपणा, उत्साह, शुद्धता, निर्मिती क्षमता आणि समज. हे लोक आहाराबद्दलद्दल सजग असतात. प्रकृतीला योग्य असाच आहार घेतात. उदा. ताज्या हिरव्या भाज्या, धान्य, फळे आदी. 
- तमस म्हणजे सुस्ती किंवा जडपणा. तामसी व्यक्ती आळशी असतात, खूप झोपतात. आहारात मांस आणि जड पदार्थ खाऊ शकतात. 
- रजोगुणामुळे अस्वस्थता आणि खूप सारे विचार येतात. राजसिक व्यक्ती अहंकारी, महत्त्वाकांक्षी, आक्रमक असतात व त्यांची मानसिक ऊर्जा लवकर कमी होते. त्यांना तिखट व गोड पदार्थ आवडतात. 

प्रत्येक प्रकृतीची वैशिष्ट्ये 
वात प्रकृती 
- भावनिक तरी कार्यक्षम 
- पटकन शिकतात, नवीन गोष्टींचे आकलन लगेच होते पण पटकन विसरतात. 
- चांगली कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती 
- बारीक, उंच आणि भरभर चालणारे 
- हात व पाय थंड असतात. थंडी मानवत नाही. 
- उत्साही आणि आनंदी 
- सारखी बदलणारी मनःस्थिती आणि अनियमित वेळापत्रक 

पित्त प्रकृती 
- मध्यम, कणखर, मजबूत बांधा आणि तीक्ष्ण मन 
- उत्तम एकाग्रता 
- नीटनेटकेपणा, लक्ष केंद्रित करू शकणारे, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि उत्तम वक्ता 
- व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्ववान आणि उद्योजकता, उत्कट, रसिक. 
- असंतुलन झाल्यास आक्रमक, रागीट होतात. 
- चांगली पचनशक्ती आणि भूक 

कफ प्रवृत्ती 
- स्थिर, विश्‍वासू, सरळ स्वभावाचे, प्रेमळ आणि सर्वांना सामावून घेणारे 
- काटक शरीर, बळकट, जड आणि तरतरीत बांधा 
- मुद्दाम विचार करून चिंतनशील आणि हळूवार बोलणे. 
- शिकण्यासाठी वेळ लागतो पण जास्त वेळ लक्षात राहते. 
- मऊ केस व त्वचा, मोठे खोल डोळे, हळू व गोड आवाज. वजन वाढण्याची शक्यता असते आणि पचनशक्ती मंद असते. 
- लगेच उदास होतात पण स्वयंपूर्ण, सभ्य आणि आयुष्याकडून फारशा मागण्या नसणारे असतात. 

आयुर्वेद तुम्हाला तुमचा आहार निवडण्यात मदत करेल. तुमच्या प्रकृतीनुरूप आहारातील सोपे बदल तुम्हाला आरोग्यपूर्ण व संतुलित जीवन जगण्यासाठी मदत करतात. मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी तम, रज व सत्वगुणांची आवश्यकता आहे. कुठल्याही स्वभाव किंवा प्रकृतीसाठी सात्त्विक आहार सर्वोत्तम आहे. विचारपूर्वक आहार निवडा आणि आनंदमयी ध्यानाचा रस्ता मोकळा करा 
(श्री श्री रविशंकर यांच्या ‘ध्यानाची रहस्ये’ या व्याख्यानांवर आधारित) 

अधिक वाचा https://www.artofliving.org 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com