Sadhguru explains how awareness transforms one’s relationship with karma
इनर इंजिनिअरिंग
सद्गुरू (ईशा फाउंडेशन)
सद्गुरू : कर्म निर्माण करण्याची भीती हे सर्वांत वाईट कर्म आहे. कर्म हा काही तुमचा शत्रू नाही; हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही इथे जिवंत आहात ते केवळ तुमच्या कर्मामुळे. कर्म हा तुमचा शत्रू नाही. सध्या तुमच्या भौतिक शरीराच्या अस्तित्वाचा आधार तुमचे कर्म आहे. जर तुमचे सर्व कर्म तात्काळ काढून टाकले गेले, तर याच क्षणी तुम्ही तुमचे शरीर सोडून जाल. हे तुमचा प्लग ओढून काढण्यासारखे आहे. या क्षणी तुम्ही तुमचे कर्म नष्ट करा आणि याच क्षणी तुम्ही तुमचे शरीर सोडून जाल. तुम्ही तुमच्या शरीराला यापुढे धरून ठेवू शकत नाही. तर कर्म हा एक डिंक आहे; कर्म म्हणजे ते आहे, ज्याने तुमच्या शरीराला एकत्र बांधून ठेवले आहे.