esakal | योगा लाइफस्टाईल : योगा आणि गॉसिप
sakal

बोलून बातमी शोधा

yoga lifestyle

योगा लाइफस्टाईल : योगा आणि गॉसिप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गॉसिप म्हणजे एक प्रकारची हिंसाच. त्यातून कोणीतरी दुखावला जातो आणि एकूणच ते विध्वंसक आहे. नकारात्मक वक्त्यव्याचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात. त्याचबरोबर ती व्यक्ती स्वतःविषयीचा आदर, नोकरी, मित्र, करिअरही गमावू शकते. परंतु हेही लक्षात घ्यावे की, नकारात्मक बोलणाऱ्याची त्यापेक्षा जास्त हानी होते. गॉसिपच्या माध्यमातून केलेल्या नकारात्मक कर्माचा आत्म्यावर परिणाम होतो व त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढील अनेक जन्मांसाठी त्रास सहन करावा लागतो.

आपल्या बोलण्यावर, वागण्यावर विचारांवर सर्वप्रथम यम, अहिंसा यांचा अंतर्भाव करावा. तीव्र शब्दांच्या वेदनेचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. परंतु एक योगिक तत्त्वज्ञान कायम लक्षात ठेवावे, ते म्हणजे, आपण केलेल दुश्‍कर्म पुन्हा आपल्यावर येऊन आदळते. किंबहुना लोकांना ‘प्राण्या’च्या नावाने संबोधने अपमानास्पद आहे. उदा ः एखाद्याला कुत्रा, डुक्कर किंवा उंदीर संबोधने. केवळ अहंकार आणि श्रेष्ठत्वाची भावना जपण्यासाठीच आपण प्राण्यांचा गैरवापर करत असतो. एखाद्याला त्याचे लिंग किंवा जातीवाचक शब्द वापरून वारंवार डिवचल्यास तिच्यात लैंगिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.

सत्य आणि गॉसिप यांच्यातील संबंध अपरिहार्य आहेत. सत्यात अस्सलपणा असतोच आणि त्यातून स्वतःशी, सत्याशी हातमिळवणी केलेली असते. त्याचबरोबर सत्य आणि विश्वास यांचा परस्पर संबंधही असतो. आपण एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल सांगत असलेली गोष्ट त्याला थेटपणे सांगण्यापेक्षा वेगळी असेल, तर त्यावेळी आपण विश्वासार्ह आहोत का? याचे नक्कीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.

आपण असत्याचे मूळ शोधायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपणाला जाणवते की, हेवेदाव्यांच्या भावनेने काम करण्याची ती एक प्रथा आहे. दुसऱ्याकडे असलेले आपल्याला पाहिजे आहे, ही मानसिकता त्यामागे असते. गॉसिपच्या माध्यमातून दुसऱ्याच्या मालमत्तेचा, कर्तृत्वाचा, प्रतिभेचा किंवा संबंधित व्यक्तीचा हातखंडा असलेल्या विषयाचा हेवा केल्याने नक्की काय निष्पन्न होते, याचा क्षणभर विचार करा.

एक गोष्ट लक्षात घ्या, असत्य, अपरिग्रह हे कमतरतेच्या भावनांचा प्रतिकार करण्याचे किंवा स्वतःसाठी काहीतरी हवे असण्याचे साधन आहे. याच्या मुळाशी स्पर्धा किंवा आपल्यातील कमतरतेची भावना असते. आपण परिपूर्ण नसल्याची भीतीही यामागे असते. गॉसिप करण्याने वेगळेपणाची तसेच आत्मवंचनेची जाणीव होते. स्पर्धा करण्याऐवजी औदार्य दाखवून आपण असत्य आणि अपरिग्रह यावर मात करू शकतो.

हेही वाचा: जंगल मंगल : कठीण उभ्या चढाईचा देखणा राजगड

ब्रह्मचर्य आपल्यातील ऊर्जेचे योग्य पद्धतीने नियमन करण्याबरोबरच निरपेक्ष सत्य आणि वास्तवाची जाणीव कायम ठेवण्यास भाग पाडत असते. अर्थात, ते आपल्या बोलण्यावरही लागू पडते. एका अर्थाने गॉसिप करणे म्हणजे अतिभोगाची भावना किंवा स्वतःवरील नियंत्रणाचाअभाव असून, त्याद्वारे हेतू असो अथवा नसो, चुकीची माहिती प्रसारित होत असते. या वायफळ गप्पांपासून स्वतःला वाचविण्याचे आत्मबळ हेच योग्य साधन आहे. आई आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगत असते, ‘तुम्हाला चांगले बोलता येत नसेल तर गप्प बसा!’

माझ्या मार्गदर्शकांपैकी एक असलेल्या प्रशिक्षकाने मला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ‘बोलण्यायोग्य जागा असेल किंवा माझ्याकडे भर घालण्यासारखे असेल तेव्हाच मी बोलतो; अन्यथा शांत राहतो.’ पुढे जाऊन तो म्हणाला, ‘मी शब्दांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करतो. आयुष्यात साकार करता येणार नसलेल्या गोष्टींबद्दल मी कधीच बोलत नाही.’

हेही वाचा: टर्निंग पॉइंट : ‘रयत’ने मला घडविले

यम, आसन आणि चिंतन या योगाच्या सर्व पद्धतींतून आत्म्याचे शुद्धीकरण होते. आपल्याला योग्य कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. विचारांची योग्य दिशा हा योग जीवन जगण्याचा पाया आहे. त्यामुळे आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याबरोबर योग्य आहाराची, भौतिक साधनांची, मित्रांची निवड करण्यास मदत होते, इतकेच नव्हे, तर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

निर्मळ बोलणे निर्हेतूक असते. आजच्या सोशल मीडियाच्या युगात, आपण आपली ऊर्जा कोठे गुंतवत आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण आपल्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड करत राहिल्यास व्यक्तिनिर्माणाच्या प्रक्रियेत निश्चितच मागे पडू. लक्षात ठेवा, मनुष्याला बोलण्याची शक्तिशाली देणगी मिळाली असून, तिचा सूज्ञपणे आणि आस्थेवाईकपणे वापर व्हावा.

loading image
go to top