Anil Deshmukh: काकांनी पुतण्याला केलं चितपट; भाजपप्रवेशाच्या आधीच आशिष देशमुखांना झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

Anil Deshmukh: काकांनी पुतण्याला केलं चितपट; भाजपप्रवेशाच्या आधीच आशिष देशमुखांना झटका

Anil Deshmukh: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळालं आहे. काँग्रेसमधून निलंबीत केलेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोटपले होते.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं वर्चस्व असलेल्या नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीच्या सभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख गटाचे सभापती कायम राहणार.

असल्याने अशिष देशमुख गटाला मोठा दणका बसला आहे. शुक्रवारी अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आलं यात अशिष देशमुख गटाला १० मतं मिळाली तर अनिल देशमुख गटाला ६ मतं मिळाली.

अविश्वास प्रस्ताव पारित व्हायला ११ मतं आवश्यक होती, मात्र अशिष देशमुख गटाचं एक मत बाद झाल्यामुळे अनिल देशमुख गटाचा सभापती कायम राहणार आहे. यानंतर कार्यकर्तांकडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या विरोधातील भूमिका माजी आमदार आशीष देशमुख यांना महागात पडले आहे. त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे.

त्यानंतर ते पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. आशिष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. काका तसेच माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.

मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम केला. नंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्याविरोधात निवडणूकदेखील लढवली. मात्र मागील काही दिवसांपुर्वी देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

टॅग्स :Anil deshmukh