गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय असे सांगून, एका व्यक्तीच्या खात्यातून २ लाख ६२ हजार रुपये लंपास

file photo
file photo

नांदेड - मोबाईलवर कॉल करून कस्टमर केअरवरून बोलत असल्याचे सांगून पासवर्ड, युजर नेम, गुगल पे, युनो, लाईट ॲप यांचे युजर आयडीत पासवर्ड टाईप करण्यास सांगून त्यानंतर पासवर्ड हस्तगत करून बॅँक खात्यातून दोन लाख ६२ हजार ७४४ रुपये आॅनलाइन फसवणुक करून काढून घेतल्याची घटना गोकुंदा (ता. किनवट) येथे घडली. याबाबत किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोकुंदा (ता. किनवट) येथील भीमराव ज्ञानेश्वर मेहत्रे (वय ३४, रा. आंबेगाव, ता. जि. लातूर, हल्ली मुक्काम गोकुंदा) यांच्या खात्यात पाच लाख रुपये शिल्लक होते. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून गुगल पे ॲप डाऊनलोड करून त्यांच्या खात्यातील एक लाख रुपये त्यांच्या भावाच्या खात्यावर पाठवले. मात्र, त्यांच्या भावाच्या खात्यात ते जमा झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचे खाते तपासले असता चार लाख रुपये शिल्लक होते. एक लाख रुपयांबाबत त्यांनी गुगल पे च्या कस्टमर केअरला फोन केला असता फोन लागला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने ९१ - ८१०१२९५५०० या क्रमांकावरून कॉल आला आणि कस्टमर केअरवरून बोलते, असे भासवून त्यांनी भीमराव मेहत्रे यांच्याकडून पासवर्ड, युजर नेम, गुगल पे, युनो, लाईट ॲप यांचे युजर आयडीत पासवर्ड टाईप करण्यास सांगून त्यानंतर पासवर्ड हस्तगत करून बॅँक खात्यातून दोन लाख ६२ हजार ७४४ रुपये आॅनलाइन फसवणुक करून काढून घेतले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी किनवट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत. 
 
हेही वाचा - Success Story: टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी! माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे यशस्वी प्रयोग 

दहा हजाराच्या मोबाईलची चोरी
नांदेड ः किनवट शहरातील अशोक स्तंभ येथे सचिन अशोक जाधव (वय २१, रा. गंगानगर, किनवट) याचे चहाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजता तो दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुकानावर ठेऊन चहा देण्यासाठी गेला. परत आला असता त्याचा मोबाईल चोरीला गेल्याचे कळाले. कोणीतरी त्याचा मोबाईल चोरून नेला. याबाबत किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक चौधरी करत आहेत. 

दुचाकीची चोरी
नांदेड ः देगलूर शहरातील मानव्य विकास विद्यालयाजवळ झाडाखाली भीमराव लच्छ्मन्ना बोन्लावार (वय ५४, रा. देशपांडे गल्ली, देगलूर) यांनी त्यांची दहा हजाराची दुचाकी (एमएच २६ - यु ६७९९) मंगळवारी (ता. २९) सकाळी अकरा वाजता उभी केली. चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार ताहेर शेख करत आहेत. 

जुगार खेळणाऱ्यांना पकडले
नांदेड ः नांदेड शहरातील मालेगाव रस्त्यावर राठोड कॉम्प्लेक्सच्या बोळीमध्ये विना परवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळवत आणि खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख सात हजार २० रुपये पोलिसांनी जप्त केले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार आशिष बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार श्रीरामे करत आहेत. 

जुगार खेळणाऱ्यांना पकडले
नांदेड ः हणेगाव (ता. देगलूर) येथील बाजार समितीच्या मोकळ्या जागेत मंगळवारी (ता. २९) सायंकाळी सातच्या सुमारास बिना परवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य आणि रोख दोन हजार रुपये जप्त केले आहेत. याबाबत पोलिस जमादार मोहन कनकवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अडीच हजाराची देशी दारू जप्त
नांदेड ः किनवट तालुक्यात मांडवी ते नागापूर जाणाऱ्या रस्त्यावर कोठारी पॉईंट येथे मंगळवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या दोन हजार ४९६ रुपयांची देशी दारू आढळून आली. त्याने ती चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगली होती. याबाबत फौजदार जमाखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार कोळी करत आहेत. 

विदेशी दारू पकडली
नांदेड ः हिमायतनगर रेल्वे स्थानकासमोर मंगळवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता एकाजवळ विनापरवाना आणि बेकायदेशररित्या चार हजार सहाशे रुपयांची विदेशी दारू सापडली. त्याने ती दारू विना परवाना आणि बेकायदेशरिरित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली होती. याबाबत पोलिस नायक बालाजी लक्षटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com