जिल्ह्यासाठी २५ हजार कोरोना चाचणी किट ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान गतिमान होणार  - डॉ. निळकंठ भोसीकर -

शिवचरण वावळे
Monday, 5 October 2020

कोरोना चाचणीसाठीच्या किट उपलब्ध नसल्याने चांचण्या वेग मंदावला होता. अनेक नागरीक स्वःताहून कोरोना चाचणी साठी चाचणी सेंटरवर येऊन परत जात होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी कोरोना चाचणी किटची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात २५ हजार कोरोना चाचणी किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना चाचणीचा मंदावलेला वेग वाढणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास नवल वाटणार नाही.

नांदेड - आरोग्य विभागाने कोरोना चाचणीसाठी २५ हजार कोरोना किटची मागणी केली होती. चार दिवसापूर्वीच जिल्ह्यासाठी २५ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान मोहिम अधिक वेगाने राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

केंद्रीय आरोग्य पथकाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशभरातील अतिसंवेदनशिल जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा दर कमी असल्याने व मृत्यूचे दर अधिक असल्याने मृत्यूदर आटोक्यातयावा आणि दिवसाला कमीतकमी दीड हजार कोरोना टेस्ट झाल्या पाहिजे. यासाठी केंद्राच्या आरोग्य पथकाने राज्य सरकारला सुचना केल्या होत्या. त्यानुसार काही दिवस जिल्ह्यात दिवसाला एक हजार ५०० चाचण्या करण्यात येत होत्या.  परंतु कोरोना चाचणीसाठी लागण्याऱ्या किटची कमतरता भासू लागल्याने आठवडाभरापासून कोरोना चाचण्यांची संख्येत घट झाली होती. 

हेही वाचा- ‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग ​

नागरीकांनी स्वःताहून पुढे यावे

जिल्ह्यास कोरोना चाचणी किट मिळाल्यास टेस्ट वाढविणे शक्य होईल, या हेतुने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी २५ हजार किटची मागणी केली होती. त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री व हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमादार बालाजी कल्याणकर यांनी देखील कोरोना चाचणीसाठी मागणी लावून धरली होती.

हेही वाचले पाहिजे- मॉं जिजाऊंचे संस्कारच बलात्काराच्या घटना थांबवू शकतात- डॉ गंगाधर घुटे

आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

सर्वांच्या मागणीमुळे जिल्ह्यास २५ हजार कोरोना चाचणी किट उपलब्ध झाल्या असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वःताहून तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25,000 corona test kits for the district The 'My Family, My Responsibility' campaign will gain momentum - Dr. Nilkanth Bhosikar Nanded News