
ही कारवाई मुदखेड तालुक्यात शनिवारी (ता. नऊ) राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री केली. यावेळी आरोपीचा पाठलाग करतांना एका दुय्यम निरिक्षकांना दुखापत होऊन ते जखमी झाले.
नांदेडमध्ये हातभट्टी व देशी दारुसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त
नांदेड : जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात हातभट्टी व देशी दारु अवैध मार्गाने विक्री करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मुदखेड तालुक्यात शनिवारी (ता. नऊ) राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री केली. यावेळी आरोपीचा पाठलाग करतांना एका दुय्यम निरिक्षकांना दुखापत होऊन ते जखमी झाले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासह सर्वच शासकिय यंत्रणा कामाला लागली आहे. पोलिस बंदोबस्त कामी रस्त्यावर असल्याने अवैध धंदेवाल्यांचा जिल्हाभरात हैदोस सुरू आहे. मात्र देशी व हातभट्टी अवैध रित्या विक्री करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क करीत आहेत. या विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकांनी जिल्हाभरात धडक कारवाई सुरू केली आहे. नांदेड, मुदखेड, किनवट या तालुक्यात देशी दारु, हातभट्टी, शिंदी हे मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा - Nanded Breaking : शनिवारी दिवसभरात सात पॉझिटिव्ह ; संख्या ४५ वर
आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई
दोन दिवसापूर्वीच चिकाळा तांडा परिसरातून तब्बल ३२ आरोपीना अटक करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले होते. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा या विभागाने मुदखेड तालुक्यात छापा टाकला. यावेळी देवळा तांडा आणि तारदळा तांडा या परिसरातून ताडी १३० लीटर, हातभट्टी ३० लीटर, रसायन १४१० लीटर आणि तीन दुचाकी असा सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी १२ आरोपींना अटक केली.
येथे क्लिक करा - महावितरणला : वादळीवारा व पावसाचा फटका
यांनी घेतले परिश्रम
सदर कार्यवाही मध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, पी. ए. मुळे, दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, आर. एस. कोतवाल, पी. बी. टकले, पी. जी. कदम, टी. बी. शेख, बी. एस. पडुळ, व्ही. टी. खिल्लारे, श्री. सदावर्ते, जवान भोकरे,नारखेडे, आनकाडे, संगेवार, खतीब, राठोड, जाधव
नांदुसेकर, भालेराव, दासरवर, सुरनर, फाळके, अब्बास पटेल, रेनके, वाहन चालक संगेवार, जाधव, रावसाहेब बोदमवाड, महिला जवान टेंभुर्णे यांनी परिश्रम घेतले.
Web Title: Seized Wine And Goods Worth Rs Two Lakh Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..