नांदेडला मंगळवारी दिवसभरात ६६ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

अभय कुळकजाईकर
Tuesday, 27 October 2020

नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी (ता. २७ आक्टोंबर) आलेल्या अहवालात ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या ७३१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी ३७ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, दिवसभरात दोन जणांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर औषधोपचारानंतर दिवसभरात १०८ रुग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत. 

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २७) सायंकाळी आलेल्या अहवालात ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उपचार सुरू असताना दोन जणांचा मृत्यू झाला असून ३७ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. दरम्यान, दिवसभरात १०८ रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. मंगळवारी सायंकाळी ६४७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५४६ निगेटिव्ह तर ६६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या १८ हजार ८६२ झाली आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’ 

३७ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर
दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मरळक (ता. नांदेड) पुरुष (वय ७२) आणि सुजलेगाव (ता. नायगाव) पुरूष (वय ४७) या दोघांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात ५०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात १०८ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १७ हजार ४९८ जणांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ७३१ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३७ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध
मंगळवारी दिवसभरात ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात २७, नांदेड ग्रामिण - एक, बिलोली - दोन, अर्धापूर - एक, हदगाव - एक, मुखेड - नऊ, धर्माबाद - एक, मुदखेड - एक, हिमायतनगर - दोन, देगलूर - तीन, कंधार - सात आणि किनवट येथील एका रुग्णाचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५.९८ टक्के आहे. मंगळवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७५, जिल्हा रुग्णालयात ६५ तर आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालयात ९० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.  

हेही वाचलेच पाहिजे - कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत 

नांदेड कोरोना मीटर
एकूण स्वॅब - एक लाख आठ हजार ३६८
एकूण निगेटिव्ह स्वॅब - ८६ हजार २१४
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - १८ हजार ८६२
आज मंगळवारी पॉझिटिव्ह - ६६
एकूण कोरोनामुक्त - १७ हजार ४९८
आज मंगळवारी कोरोनामुक्त - १०८
एकूण मृत्यू - ५०४
आज मंगळवारी मृत्यू - दोन
सध्या उपचार सुरू - ७३१
सध्या प्रकृती अतिगंभीर - ३७
प्रलंबित स्वॅब संख्या - ३५९


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 66 positive in Nanded on Tuesday; Death of two, Nanded news