esakal | नांदेडमध्ये पोलिसांनी पाठलाग करून दोन संशयितांना पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले तर एकजण पळून गेला.

नांदेडमध्ये पोलिसांनी पाठलाग करून दोन संशयितांना पकडले

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: शहरातील मालेगाव रस्त्यावर भावसारनगर पाटीजवळ असलेल्या बरडे हॉस्पिटलसमोर तीन जण एकास खंजीरचा धाक दाखवून लुटत असल्याचे गस्तीवर असलेल्या भाग्यनगर पोलिसांच्या पथकास सोमवारी (ता. दोन) रात्री बाराच्या सुमारास दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले तर एकजण पळून गेला.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात दोन महिन्यांत ६८ टक्के पाऊस, माहूरला कमी नोंद

भाग्यनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आश्रोबा घाटे हे हवालदार ओमप्रकाश कवडे, अंमलदार बाबर यांच्यासोबत रात्री गस्त घालत होते. त्यावेळी तिघेजण एकाला खंजीरचा धाक दाखवून लुटमार करताना दिसले. पोलिसांना बघितल्यानंतर ते पळून जाऊ लागले. घाटे आणि कवडे यांनी त्यांचा जवळपास एक किलोमीटर पाठलाग केला. तिघांपैकी पोलिसांनी अजिंक्य ऊर्फ सोनू विश्वनाथ कावळे (वय ३८, रा. तथागतनगर, तरोडा खुर्द) आणि नितीन उत्तमराव ढोले (२०, रा. परवानानगर) या दोघा संशयितांना अटक केली.

हेही वाचा: राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

तिसरा संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे लुटलेले सातशे रुपये आणि एक खंजीर तसेच दुचाकी जप्त करण्यात आली आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top