esakal | कार्यकर्त्यांनी समाज शरण वृत्तीने कार्य करावे- डॉ. विजय लाड
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे सात दिवस फेसबुक व युट्यूबवर चालणाऱ्या अभ्यासवर्गाचे उदघाटन राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड़ यांच्या उपस्थितीत झाले.

कार्यकर्त्यांनी समाज शरण वृत्तीने कार्य करावे- डॉ. विजय लाड

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ग्राहक पंचायतचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी सांगितल्या प्रमाणे, कार्यकर्त्यांनी समाज शरण वृत्तीने कार्य करावे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड  यांनी प्रतिपादन केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे सात दिवस फेसबुक व युट्यूबवर चालणाऱ्या अभ्यासवर्गाचे उदघाटन राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड़ यांच्या उपस्थितीत झाले.  नाशिक विभाग अध्यक्ष प्रा. बाबासाहेब जोशी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करुन अभ्यासवर्ग उदघाटन  करण्यात आले..आपल्या मनोगतात प्रा. जोशी म्हणाले की ग्राहक चळवळीतील विचार हे स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जयप्रकाश नारायण यांचे तत्वज्ञानाशी निगडित आहे. .कार्यक्रम च्या सुरुवातीला कोमल जैन ने ग्राहक गित म्हटले.विदर्भ विभाग अध्यक्ष शाम पात्रीकर,कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एस.एन. पाटिल,  मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा जालन्याचा पिस्तुलधारी युवक नांदेड पोलिसांच्या जाळ्यात -

कोरोनाच्या काळात देखील ग्राहक पंचायतचे कार्य अविरत सुरु

मेघाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत व महिला संघटन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात देखील ग्राहक पंचायतचे कार्य अविरत सुरु आहे. ऑनलाइन मीटिंगद्वारे आपण संवाद साधू शकतो.समाज व ग्राहक प्रबोधन करणे हे, कार्यकर्त्यांनी मनात ठासुन घेतले पाहिजे. हे विष्णु कार्य आहे. ग्रहकापर्यंत आपण पोहचले पाहिजे. जुन्या कार्यकर्त्यांनी नव्या कार्यकर्त्यांना संघटनेची मूल्ये सांगितली पाहिजे. केवळ वस्तू स्वस्त मिळवून देने हे ग्राहक पंचायतचे कार्य नाही, तर शोषणमुक्त समाज निर्मिती झाली पाहिजे. ग्राहक पंचायतचे लक्ष्मी नारायण हे दैवत आहे. त्यासाठी महिलांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन मेघाताई यांनी केले.

येथे क्लिक करानासाडी टाळण्यासाठी शाळांमध्ये खिचडीऐवजी शिधा द्यावा -

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था खऱ्या अर्थाने समाजशरण वृत्तीने कार्य करते

कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केला. त्यांनी कोरोनाचे आपत्तीमुळे आपणास सर्वांना ऑनलाईन पद्धतीने एकत्रित आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे प्रेरणेने स्थापन झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था खऱ्या अर्थाने समाजशरण वृत्तीने कार्य करते आहे असे सांगून कार्यकर्त्यांनी समाजाचे आपण देणे लागतो याच वृत्तीने वतस्थ राहून कार्य करावे असे सांगितले. तसेच यापुढील सर्व तज्ज्ञ व्यक्तींची  व्याख्याने अवश्य ऐकावे असे आवाहन केले.  कार्यक्रम प्रास्ताविक जळगाव जिल्हाध्यक्ष मनोज जैन तर सूत्र संचालन नाशिक विभाग संघटक अरुण भार्गवे यांनी केले.महेश चावला यांनी तांत्रिक बाजु सांभाळली. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील साधक कार्यकर्ते, व ग्राहक यांनी हजेरी लावली.