नैराश्य, नकारात्मकता दूर करण्यासाठी अग्निहोत्र संस्कार चांगला उपचार 

अभिजित महाजन
Thursday, 8 October 2020

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या वतीने अग्निहोत्र संस्कार पद्धतीच्या कृतीसत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्नी, वायु, आप, जल व आकाश या पंचमहाभूतापासून पृथ्वी बनली आहे. यातील अग्नीला अनन्यसाधारण महत्व आहे.

सगरोळी (जि. नांदेड) - दैनंदिन जीवनातील समस्या व त्यामुळे निर्माण होणाऱ्या तणावामुळे नकारात्मकता वाढीस लागते. नैराश्यामुळे मनावर व शरीरावर परिणाम होतो. सकारात्मक विचार निर्माण करणे व वातावरणातील प्रदूषित घटक नष्ट करून वातावरणाचे शुद्धीकरण होण्यासाठी अग्निहोत्र ही एक चांगली उपचार पद्धती असल्याने त्याचा लाभ मानवी जीवनास होतो. यासाठी मुंबई येथील ‘सत्वम भारत’ या संस्थेच्या सहकार्याने सगरोळी (ता. बिलोली) येथे नुकतेच दोन दिवसीय अग्निहोत्र संस्कार पद्धतीच्या कृतीसत्राचे आयोजन केले होते. 

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या वतीने अग्निहोत्र संस्कार पद्धतीच्या कृतीसत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अग्नी, वायु, आप, जल व आकाश या पंचमहाभूतापासून पृथ्वी बनली आहे. यातील अग्नीला अनन्यसाधारण महत्व आहे. तांब्याच्या पात्रात देशी गायीच्या शेणापासून बनलेली गौरी, देशी गायीचे तूप, साळीच्या तांदुळास सुर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मंत्रोच्चार करून अग्नी दिल्यास वातावरणातील प्रदुषित घटक नष्ट करून शुद्ध, चैतन्यमय वातावरण व आरोग्यासाठी अनुकूल सकारात्मकता आणण्याचे काम अग्निहोत्रद्वारे साध्य करता येते. 

येथे क्लिक कराजिल्ह्यासाठी लवकरच ४० हजार कोरोना किट मिळणार - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर -

अग्निहोत्र यज्ञाचे अनेक लाभ

हवेतील रोगजंतूपासून होणाऱ्या संसर्गाला प्रतिबंध घातल्या जाते त्यामुळे सुरक्षितता प्राप्त होते. आपले मन नेहमी प्रसन्न, आनंदी, क्रियाशील होते. यामुळे एकाग्रता, योगसाधना, ध्यानधारणा सहजपणे करता येणे शक्य होते. विदेशातील लोकांनी अग्निहोत्र यज्ञाद्वारे दुर्धर आजार व व्याधींवर मात केली आहे. अग्निहोत्र यज्ञाचे शास्त्रीय लाभ होतात हे अनेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. 

वैज्ञानिक दृष्टीकोनातून माहिती

यावेळी मंदार कोपरे आणि डॉ. अमोल अहिवळे यांनी नियमित अग्निहोत्रापासून होणारे लाभ तथा त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयीची माहिती प्रत्यक्ष संस्कार पद्धतीसह सांगितली. तसेच याचा लाभ झालेल्या साधकांचे झूम मिटिंगद्वारे विचारही ऐकवले. अत्यंत अल्प खर्चात व कमी वेळेत केला जाणारा हा संस्कार नियमित केल्यास नक्कीच लाभ मिळतो. या उपक्रमासाठी संस्थेचा माजी विद्यार्थी मनोज पांचाळ याने पुढाकार घेतला होता. 

हेही वाचा सकाळ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील यांचे आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.

अग्निहोत्र यज्ञामुळे काय होते... 
अग्निहोत्र यज्ञामुळे मानसिक तणावापासून मुक्ती, रक्ताभिसरणातील समतोल, त्वचारोगापासून संरक्षण आदी फायदे या नियमित केल्या जाणाऱ्या संस्कारातून मिळतात. जीवमात्रांचे आणि वनस्पतींचे पोषण होण्यासाठी योग्य मदत मिळते. तांब्याच्या पत्रातून निघणाऱ्या धुरांमुळे एकाग्रता निर्माण होऊन बुद्धीस चालना मिळते, स्मरणशक्ती विकसित होते. विद्यार्थ्यांनाही अभ्यासामध्ये याचा फायदा होतो. 

संपादन - अभय कुळकजाईकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agnihotra rites are a good treatment for depression and negativity nanded news