esakal | अर्धापूर : गुटखा बंदीसाठी पाच वर्षात 166 निवेदनं, प्रशासन मात्र गप्प
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातीलआवैध गुटखा विक्री बंदीसाठी त्यांनी दिले  पाच वर्षात 166 वेळा निवेदन, तरीही सर्व यंत्रणा जैसे थे. कोरोनाच्या काळातही खुलेआम विक्री- बालाजी आबादार 

अर्धापूर : गुटखा बंदीसाठी पाच वर्षात 166 निवेदनं, प्रशासन मात्र गप्प

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड): तंबाखूजन्य पादार्थाचे सेवनाने शरीरावर घातक परिणाम लक्षात घेवून राज्यशासनाने गुटखा विक्री,साठा,वाहतुक यावर बंदी घातली आहे.या बंदिचा बोजवारा इतर बंदी प्रमाणे उडाला असून राज्यातील कोणत्याही शहरात, गाव, वाडी ,तांड्यावर सहज उपलब्ध होतो. गुटख्याचीअवैध विक्री निदान कोरोनाच्या काळात तरी बंद व्हावी या मागणीचे 166 वे निवेदन आमच्या आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी आबादार यांनी दिले आहे. त्यांचा लढा गेल्या पाचवर्षापासून सुरू आहे. त्यांनी पहिले निवेदन जानेवारी 2015 मध्ये दिले होते तर काही दिवसापुर्वी 166 वे निवेदन दिले.

गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री, साहाय्यक आयुत्त आन्न व औषध प्रशासन, पोलीस अधिक्षक नांदेड, जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, मंत्री ,पोलीस ठाणे आदी प्रशासनातील अधिका-यांना दिले. पण कोणताच परिणाम गुटखा विक्रीवर झाला नाही.

हेही वाचा -  खरीप हंगाम गेला, आता मदार रब्बी हंगामावर

गुटखा विक्री सुरू बंद असा खेळ

अन्न व औषध प्रशासन आधूनमधून कार्यवाही करते, पोलीस छापा टाकते, पुन्हा गुटखा विक्री सुरू बंद असा खेळ गुटखा बंदीपासून सुरू आहे. गुटख्याच्या गोरख धंद्यात मात्र आनेकांनी आपले ऊखळ पांढरे करून घेतले आहे. गुटखाच्या विक्री बंदीचा कायदा केवळ कागदावर शिल्लक राहिला आहे. राजरोसपणे विक्री, वाहतूकसाठा केला जात आहे. या धंद्यात आनेकांनी आपले हात ओले करून घेतल्यामुळे या अवैध धंद्यावर कोणताच परिणाम झाला नाही. एक साखळी निर्माण झाली आहे.

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे

जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री बंद व्हावी यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी आबादार यांनी गेल्या पाच वर्षापासून लढा देत आहेत. त्यांनी गुटखा बंदीच्या आमलबजाणीसाठी पहिले निवेदन एक जानेवारी 2015 मध्ये जिल्हाधिका-यांना दिले होते. तेव्हा पासुन त्यांनी विविध प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहेत. तर सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. या परिस्थितीत तरी गुटखाबंदीची आमलबजानी व्हावी यासाठी त्यांनी 166 वे  निवेदन 19 आक्टोबरला जिल्हाधिका-यांना दिले आहे. त्यात आत्ता पर्यंत दिलेल्या अर्जाचा संदर्भ तारखे निहाय दिले. या कोरोनाच्या काळात तरी आमलबजानी व्हावी आशी मागणी करण्यात आली.

येथे क्लिक करादुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -

कोरोनाच्या काळात तरी विक्री बंद व्हावी

गुटखा विक्रीला बंदी आसली तरी राजरोसपणे विक्री सुरू आहे. बंदीची आमलबजावणी  करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. या आवैध धंद्यात खुप मोठा भ्रष्टाचार होत आहे. बंदिचा कायदा आहे हे नागरिकांना कळले पाहिजे. गुटखा हा शरिरासाठी घातक आहे. अवैध गुटखा विक्री बंद व्हावी तासाठी गेल्या पाच वर्षापासून निवेदन दिले आहे. तसेच सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनीही निवेदन दिले. पण हा अवैध व्यापार सुरूच आहे. कोरोनाच्या काळात तरी विक्री बंद व्हावी आशी प्रतिक्रिया बालाजी आबादार यांनी दिली.

संपादन  प्रल्हाद कांबळे