esakal | अर्धापूर- वसमत रस्त्यावर कामठापाटीजवळ अपघात, पाच जण जखमी, एक गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हा अपघात रविवारी (ता.२० ) सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अर्धापूर- वसमत रस्त्यावर कामठापाटीजवळ अपघात, पाच जण जखमी, एक गंभीर

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : अर्धापूर- वसमत रस्त्यावरील कामठा पाटीजवळ टाटा सुमो व ट्रकचा अपघात झाला असून टाटा सुमोमधील पाच जण जखमी झाले आहेत. या जखमीमधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वसमतफाटा महामार्ग पोलिसांनी दिली. हा अपघात रविवारी (ता.२० ) सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत वसमतफाटा महामार्ग पोलिस पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, वसमतकडून मालवाहतूक करणारा ट्रक(जेजी31-टी- 0059) अर्धापूरकडे येत होता. यावेळी अर्धापूरकडून एक टाटा सुमो (डब्ल्युबी 52- सी- 2804) वसमकडे जात असताना कामठा पाटीजवळ दोन्ही वाहणांचा समोरासमोर अपघात झाला. या आपघातात टाटा सुमोमधील चांदु राजाराम कांबळे ( वय  ५०) रा. मालेगाव (ता. अर्धापूर) जि.नांदेड 
पवित्र पागल सरदार (वय ४५) रा. पुष्पनगर ता. आरजुनी जि. गोंदिया , दिलिप माधवराव नैताम (वय २९)  रा. बाोरसा ता. अरजुनी जि.गोंदिया, जयदेव लक्ष्मन कदम (वय ३२) रा. बाोरटोला, जि. गोंदिया आणि  संतोष पंडितराव गायकवाड (वय ३१) रा. भास्कर कॉलनी मालेगाव ता. अर्धापूर हे जखमी झाले.

हेही वाचाहिंगोली : जमिनीतील गुढ आवाजाने गावकऱ्यांची उडाली झोप, पोतरा, सिंदगी येथे झाला आवाज

या अपघाताची माहिती मिळताच वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस कर्मचारी व अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दखल केले आहे. या जखमीमधील एकाची प्रकृती गंभीर आसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात ट्रक पलटी झाला असून टाटा सुमोचेही खूप मोठे नुकसान झाले. अपघात होताच बघ्यांची गर्दी झाली होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image