अशोक चव्हाण
अशोक चव्हाण sakal

तुमची पंधरा काम आणि माझं एकच काम,ते करा : अशोक चव्हाण

आता भाजपमध्ये कोणी थांबायला तयार नाहीत.

डोणगाव (जि.नांदेड) : तुमची पंधरा कामं, आणि माझ एकच काम, ते करा आणि सर्व कामे माझ्यावर सोपवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मतदारांना केले. देगलूर पोटनिवडणुकीतील (Deglur Bypoll) काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारसभेत आज शुक्रवारी (ता.२२) डोणगाव येथे ते बोलत होते. चव्हण म्हणाले, की रावसाहेब अंतापूरकरांना पाच वर्षांकरिता आपण निवडून दिले होते. दुर्दैवाने ते पाच वर्ष पूर्ण करु शकले नाहीत. जितेशला दुप्पटीने जास्त मते मिळाली पाहिजे. आता भाजपमध्ये कोणी थांबायला तयार नाही. ती सर्व काँग्रेसमध्ये आली आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही अनुभव घेतला. आता भाजप सोडून लोक काँग्रेसमध्ये येत आहेत. आपला जिल्हा कुटुंब एकत्र करु, असे मागणी त्यांनी उपस्थितांना केली. खोट बोलण्याचे काम नाही आणि आम्ही कधी खोट बोलत नाही. काम करायची इच्छा आहे. साथ तुम्ही दिली पाहिजे. मराठा, मुस्लिम, बौद्ध आणि इतर लोक एकत्र राहिली तर तुम्ही विकासाची चिंता करु नका, असे चव्हाण यांनी सांगितले.

अशोक चव्हाण
अनैतिक संबंधात पती अडसर,प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा

आता दाखवून द्या मागेच्या ज्या काही कमी-अधिक त्रुटी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारु आणि आता जितेश अंतापूरकरांना विजयासाठी गाव एकवटले असल्याचे दाखवून देऊ. चिंता करु नका सगळे कागद माझ्याकडे. निवडणुका झाल्यानंतर ती कामे करु. तुमची पंधरा कामं, आणि माझं एकच काम, ते करा आणि सर्व कामे माझ्यावर सोपवा. पावसामुळे खूप नुकसान झाले. यावेळेस १५० टक्के पाऊस झाला. भाजपवाले येतील आम्ही दिलं, असं म्हणतील. अरे तुम्ही काय दिले. त्यांच्याकडे सांगायला काही नाही आहे. खोट बोल पण रेटून बोल, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. पंजाशिवाय दुसरा विषय करु नका. मतपेटी उघडली की चिठ्ठी बाहेर काढली. काही तरी करा. सोडून द्या. कोणी करणार नाही. मलाच करायचे आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com